संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्यासाठी आता केवळ १७ दिवस शिल्लक असल्यामुळे नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील ८ विभाग कार्यालयातील व त्या अंतर्गत असणारी इतर कर संकलन केंद्रे आता शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
१९ मार्च रोजी गुढीपाडवा, २१ मार्च रमजान ईद, २६ मार्च रोजी श्रीराम नवमी आणि ३१ मार्च रोजी महावीर जयंती अशा सार्वजनिक सुट्ट्या असून यादिवशीही कर संकलन केंद्रे नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेमुळे सुट्टीच्या दिवशीही कर भरणे सुलभ होणार आहे. कामकाजाच्या दिवशी सर्व कर संकलन केंद्रे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील.
नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांसाठी आठही विभाग कार्यालयांमध्ये कर संकलन केंद्रात प्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्यासाठी विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत व्हॉट्सअॅप चॅटबॉट ( 8291920504), ‘My NMMC – माझी नवी मुंबई’ मोबाईल App, महापालिकेची अधिकृत वेबसाईट www.nmmc.gov.in, कर देयकांवरील QR Code स्कॅनिंग, तसेच विविध UPI अॅप्स यांच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून याशिवाय Debit Card, Credit Card, Net Banking, RTGS आणि NEFT यांसारखे डिजिटल पेमेंट पर्यायही उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in) भेट देऊन, Whatsapp Chatbot – 8291920504 द्वारे किंवा कर संकलन केंद्रात प्रत्यक्ष जाऊन आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची संधी; विलंब शास्तीवर ५०% सवलत
नवी मुंबई महापालिकेमार्फत सुरू असलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आता मर्यादित कालावधी शिल्लक आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कर दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत एकरकमी भरल्यास विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी ही महत्त्वाची संधी असून त्यांनी या योजनेचा तात्काळ लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांना मालमत्ता कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी याकरिता शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. गुढीपाडवा, रमजान ईद, श्री राम नवमी आणि महावीर जयंतीच्या दिवशीही नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन आपला मालमत्ता कर वेळेत भरावा व नवी मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.



