• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 14, 2026

यूपीआय व्यवहार स्वीकारणारी राज्य बॅंक ठरली देशातील पहिली शिखर बँक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
यूपीआय व्यवहार स्वीकारणारी राज्य बॅंक ठरली देशातील पहिली शिखर बँक

स्वाती इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारातील त्रिस्तरीय रचनेत शिखर बँक म्हणून कार्यरत असलेल्या राज्य सहकारी बँकेसह, राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँका व सुमारे २१ हजारांहून जास्त विकास सोसायट्यांचा समावेश होतो.

सहकारातील यासह इतर सर्व संस्थांना आधुनिक डिजीटल पेमेंट प्रणालीशी जोडण्यासाठी आणि त्यांचे बँकींग व्यवहार अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘एअरपे’ या टेक्नॉलॉजी कंपनीबरोबर सहयोग करार करत स्वतंत्र यूपीआयI स्वीकारकर्ता बँक म्हणून सेवा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

‘सहकाराअंतर्गत सहकार या सहकारातील सर्वोच्च तत्वानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि नागरी सहकारी बँकांना लिपी सेवा घेण्यासाठी व्यापारी बँकांवर अवलंबून रहावे लागते. यापुढे मात्र राज्य बँकेने ‘यूपीआय स्वीकारणारी बँक’ हा दर्जा प्राप्त केल्याने सहकार क्षेत्रातील आर्थिक व्यवहार यापुढे सहकार व्यवस्थेच्या अंतर्गतच सुरक्षित राहतील.

या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने स्वतःचे यूपीआय हॅण्डल म्हणजे ओळख राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थाबरोबरच दूध संघ, साखर कारखाने व सहकारातील इतर सर्व संस्थांना देण्याचे ठरविल्याने या संस्थांना पेमेंट कलेक्शनसाठी आता शिखर बँकेचे अधिकृत यूपीआय हॅण्डल वापरता येणार आहे. अशाप्रकारे स्वतःचे अधिकृत यूपीआय हॅण्डल असणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली व एकमेव राज्य बँक ठरली आहे.

या प्रकल्पामुळे सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार सुलभ व जलद होण्याबरोबरच त्यामध्ये अधिक पारदर्शकता येईल व सहकारावरील विश्वास वाढीस लागेल. डिजीटल क्रांतीच्या या युगात ग्रामीण भागातील सभासद आणि शेतकऱ्यांना आधुनिक बँकीग सेवा प्रदान करण्याच्या दिशेने पडलेले हे योग्य पाऊल म्हणावे लागेल.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सुरु केलेल्या या प्रकल्पामुळे राज्याचे सहकार क्षेत्र अधिक डिजीटल सक्षम होईल व सदर प्रणाली अधिक स्वावलंबी होईल असा विश्वास वाटत असल्याचा आशावाद बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही नवी मुंबईकरांना भरता येणार मालमत्ता कर

Next Post

ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्वपूर्ण

Next Post
वसई-विरारमधील प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रांबाबत  विभागीय आयुक्तांना  धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्वपूर्ण

जीएसटी परताव्यावर अवलंबून न राहता ठोस उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा : आमदार निलेश राणे

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक किशोर पाटकर यांच्याकडून ३०० विद्यार्थ्यांना मोफत सायकल

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com