• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 15, 2026

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

२४ मार्चपासून रणधुमाळी; ‘या’ दिवशी होणार तुमची परीक्षा
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. विविध सात अभ्यासक्रमांसाठीच्या परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार येत्या २४ मार्चपासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे.
उच्चशिक्षण विभागाच्या एलएलबी (तीन व पाच वर्षे), बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी), बी.पी.एड., एम.एड., एम.पी.एड. व बी.एड.-एम.एड. अशा सात अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा ‘सीईटी’ कक्षाने निश्चित केल्या आहेत. या सात अभ्यासक्रमांपैकी सहा प्रवेश परीक्षेची प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील एलएलबी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची नोंदणीची मुदत रविवार (ता. १५) पर्यंत दिलेली आहे.
२०२६ ची पहिली सीईटी २४ मार्चला होणार आहे. या दिवशी एम.पी.एड. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. मार्च ते मे अशा तीन महिन्यांत या प्रवेश परीक्षा होणार आहेत. आत्तापर्यंत १२ लाख ९४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दोन्ही संधी मिळून १७ लाख ४२ हजार ६० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतील.
‘सीईटी’तील उच्चशिक्षण विभागाच्या या सात प्रवेश परीक्षेची प्रवेशपत्रे त्या-त्या प्रवेश परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध होतील. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेशी संबंधित अद्ययावत माहिती, प्रवेश पत्राची माहिती व सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘सीईटी’ कक्षाने केले आहे.

सीईटी परीक्षांच्या तारखा अशा
एम.पी.एड.- २४ मार्च
एम.पी.एड. (शारीरिक चाचणी ऑफलाइन)- २५ मार्च
एम.एड.- २५ मार्च
बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (इएलसीटी)- २७ ते २९ मार्च
एलएलबी (तीन वर्षे)- १ ते २ एप्रिल
बी. पी. एड.- ४ एप्रिल
बी. पी. एड. (शारीरिक चाचणी ऑफलाइन)- ५ ते ७ एप्रिल
बी.एड-एम.एड. (तीनवर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम)- ९ एप्रिल
एलएलबी (पाच वर्षे)- ८ मे

Previous Post

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक किशोर पाटकर यांच्याकडून ३०० विद्यार्थ्यांना मोफत सायकल

Next Post

नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com