• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 15, 2026

रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

नवी मुंबई : घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात होत असलेल्या विलंबामुळे नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना सलग पाचव्या दिवशीही गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. याला रविवारचा दिवसही अपवाद राहिलेला नसून, वाशी, सानपाडा, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली परिसरातील तसेच अन्य ठिकाणी काही गॅस एजन्सींसमोर सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. रविवारचा दिवस गॅससाठी धावपळ करण्यातच नवी मुंबईकरांचा गेला. मर्यादित पुरवठा आणि वाढलेली मागणी यामुळे अनेकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. रविवार व्यवसायाचा दिवस असतानाही अनेक भागात हॉटेल्स बंद असलेली पहावयास मिळाली.

रणरणत्या उन्हात गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहूनही काही ठिकाणी सिलिंडरचा साठा संपल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याचेही सांगितले जात आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या नागरिकांना सिलिंडर मिळवण्यासाठी कामाच्या वेळेत एजन्सीवर जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळेल की नाही याची खात्री नसल्याची नाराजी काही नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी आणि केंद्र व राज्य सरकारने घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरक्षित आणि अखंड सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त सिलिंडरची बुकिंग करू नये, असे आवाहनही प्रशासन आणि शासनाकडून करण्यात आले आहे. अनावश्यक बुकिंगमुळे वितरण यंत्रणेवर ताण येऊन प्रत्यक्ष गरज असलेल्या ग्राहकांना उशीर होऊ शकतो, असेही कंपन्यांचे म्हणणे आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानेही परिस्थिती लक्षात घेऊन रिफायनऱ्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले असून अलीकडील काही दिवसांत उत्पादनात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही काही भागांत वितरणात विलंब होत असल्याने नागरिकांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई महानगर प्रदेशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने विशेष देखरेख यंत्रणा सक्रिय केली आहे. गॅस साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रुग्णालये आणि इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्यावरही भर दिला जात आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात करत असल्याने अशा जागतिक घडामोडींचे पडसाद स्थानिक वितरण व्यवस्थेवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, घरगुती गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा करण्यात आले आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरी सध्या तरी नवी मुंबईकरांना गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ कायम आहे. पेट्रोलपंपावरही पेट्रोल व गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा दररोजच्या तुलनेत वाढू लागल्या आहेत.

Previous Post

नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com