५० टक्के सवलतीमध्ये एलईडी, घरघंटी, कुलर, रेंजर सायकलची विक्री
नवी मुंबई : भाजपा, प्रभाग क्रमांक २३ बच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्थानिक रहिवाशांना ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये स्मार्ट अॅण्ड्रोईड एलईडी, घरघंटी, कुलर, रेंजर सायकलची विक्री करण्यात येणार आहे.
१९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत नेरूळ सेक्टर १६ एमधील मार्केट, डेली निड्सच्यासमोरील टॅक्सी स्टॅण्ड, नेरूळ (पश्चिम) या ठिकाणी ही विक्री होणार आहे. खरेदी करु पाहणाऱ्यांनी सोबत आधारकार्ड बाळगणे आवश्यक आहे. ४० इंच अॅण्ड्रोईड एलईडी टीव्ही ११ हजार ९९९ रुपये, ३२ इंच अॅण्ड्रोईड एलईडी टीव्ही ७ हजार ९९९ रुपये, ४३ इंच अॅण्ड्रोईड एलईडी टीव्ही १४ हजार ९९९ रुपये, ५० इंच अॅण्ड्रोईड एलईडी टीव्ही २२ हजार ९९९ रुपये, घरघंटी ९ हजार ९९९ रुपये, ४० लीटरचा कुलर ३ हजार ४९९ रुपये, रेंजर सायकल ४ हजार २०० रुपयेमध्ये स्थानिक रहिवाशांना उपलब्ध होणार आहे. स्थानिक भाजपचे नेते गणेश भगत आणि स्थानिक नगरसेविका व ‘ब’ प्रभाग समिती अध्यक्षा सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या माध्यमातून भाजपने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

