नवी मुंबई : भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “आमदार चषक 2026 क्रिकेट स्पर्धेचा सांगता समारंभ कै. गणपतशेठ तांडेल मैदान येथे जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत 151 बेलापूर मतदारसंघातील 24 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रीडाप्रेमींसाठी रोमांचक सामने रंगले असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, स्थानिक तरुण खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे या “आमदार चषकाचे” आयोजन करण्यात येत असते. तसेच स्थानिक क्रीडाप्रेमींच्या उत्स्फुर्द प्रतिसादामुळे मैदानावर दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सदर “आमदार चषक” स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने खेळाडूंमध्ये देखील एक उर्जा निर्माण झाली होती. तसेच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मैदानावर खेळाडूवृत्ती आणि संघभावनेचे दर्शन घडवले. आमदार चषक 2026 च्या अंतिम सामन्यांमध्ये करावे 11 करावे व सारसोळे 11 सारसोळे या दोन संघामध्ये चुरस पहावयास मिळाली. त्यामध्ये करावे 11 करावे या संघांनी बाजी मारत आमदार चषक 2026 या चषकावर आपले नाव कोरले व प्रथम पारितोषिक म्हणून एक भव्यदिव्य आकर्षक चषक व रोख रक्कम म्हणून रु. 2,50,001 देऊन गौरविण्यात आले तर द्वितीय पारितोषिक सारसोळे 11 सारसोळे संघाला एक भव्यदिव्य आकर्षक चषक व रोख रक्कम म्हणून रु. 1,25,001 देऊन सन्मानित केले तर तृतीय पारितोषिक नेरूळ 11 नेरुळ या संघाला एक भव्यदिव्य आकर्षक चषक व रोख रक्कम म्हणून 75,001 देऊन सन्मानित करून संघांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते चषक व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तर संपूर्ण सामन्यातील मालाकावीर म्हणून कांतास्मुर्ती करावे संघातील संकेत भोईर व करावे 11 करावे संघातील जयेश तांडेल यांना एकत्रित मोटार सायकल (बाईक) व चषक देऊन सन्मानित केले तर नेरूळ 11 संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अजय, सारसोळे संघाचा उत्कृष्ट गोलंदाज गणेश व उत्कृष्ट फलंदाज म्हणून चंदन तलवार यांना प्रत्येकी LED TV व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून मिथुन भोईर यांना मोबाईल व सन्मानचिन्ह देऊन गौरविले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत सांगितले की, अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये खेळाची आवड वाढते, तसेच त्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळते. भविष्यातही युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी 35+ वरील खेळाडूंकरीता स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे सांगून अशा विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आयोजक तलाया ग्रुपचे पुण्यनाथ तांडेल, आश्विन पाटील, सचिन तांडेल, मिलिंद कडू, सचिन नाईक, वीरसेन कडू, शिवम तांडेल, गुरुनाथ तांडेल, विरचंद्र तांडेल, मनोहर पाटील, आकाश तांडेल, सुरेश खंडजोडे, बळराज झिरे, मयूर झिरे यांचे अभिनंदन केले.
या सांगता समारंभाला नगरसेवक तथा “अ”प्रभाग समिती सभापती दीपक पवार, माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक सुधाकर म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, माजी नगरसेविका माधवीताई शिंदे, समाजसेवक दिलीप पाटील, महेंद्र नाईक, जाट समाजाचे अध्यक्ष धरमपाल सिंह, रत्नाकर तांडेल, वकील प्रसाद मढवी, धनाजी ठाकूर, ज्येष्ठ क्रिकेटपटू तानाजी भोईर, ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनिल तांडेल, योगेश म्हात्रे, क्रांती तांडेल तसेच स्थानिक पदाधिकारी, मान्यवर, खेळाडू व मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.



