नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामध्ये विक्रम बारलगतचा महावितरण उपकेंद्र (डीपी) ते सिडकोची शिवम सोसायटी (प्लॉट १५) दरम्यान पदपथालगत महावितरणने विद्युत केबल्स टाकण्यासाठी जेसीपीच्या मदतीने केलेल्या रस्त्याचे खोदकामाच्या जागेवर तात्काळ डांबरीकरण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नेरूळ सेक्टर सहामधील रहिवाशी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
या समस्येचे निवारण करण्यासाठी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदन दिले होते. ते निवेदन City Engineer <cityengineer@nmmc.gov.in>,
Executive Engineer Nerul <ee_nerul@nmmc.gov.in>,
DMC Zone 1 dmc_zone1@nmmc.gov.in यांना आयुक्तांनी फॉरवर्डही केले. या घटनेला तब्बल २३ दिवस झाले, तरीही या ठिकाणी खोदकामाच्या जागेवर डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे आपल्या कार्यालयातून केवळ निवेदने फॉरवर्ड होतात. कार्यवाही होत नसल्याने खोदकाम झालेल्या ठिकाणी तात्काळ डांबरीकरण व्हावे यासाठी संदीप खांडगेपाटील यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त कार्यालयाला निवेदन सादर केले आहे.
महावितरणने नेरूळ सेक्टर सहामध्ये विक्रम बारलगतचा महावितरण उपकेंद्र (डीपी) ते सिडकोची शिवम सोसायटी (प्लॉट १५) दरम्यान पदपथालगत महावितरणने विद्युत केबल्स टाकण्यासाठी जेसीपीच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे खोदकाम २५ फेब्रुवारीच्या सुमारास केलेले आहे. या कामासाठी महावितरणने महापालिका प्रशासनाकडे लेखी अर्ज केलेला आहे का, महापालिका प्रशासनाने त्यास परवानगी दिली आहे, त्यासाठी आवश्यक शुल्काचा त्यांनी भरणा केला आहे का याबाबत चौकशी करावी. विनापरवानगी खोदकाम केले असेल तर महावितरणवर महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल करावा. या खोदकामामुळे रस्त्याची दु्र्दशा झाली आहे. परिसराला बकालपणा आला असून या अंर्तगत रस्त्यावर स्थानिक रहिवाशांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आजही काम सुरुच आहे. या ठिकाणी झालेले खोदकाम काही ठिकाणी बुजविण्यात आले असले तरी या रस्त्याला कच्च्या रस्त्याचे स्वरुप आलेले आहे. अशा आशयाचे निवेदन संदीप खांडगेपाटील यांनी २५ फेब्रुवारी रोजी सादर केले होते.
मुळात हे खोदकामासाठी किती जागेसाठी परवानगी घेतली व खोदकाम किती केले. तसेच खोदकाम वरवर केले आहे का, खोलवर केले आहे याचीही महापालिका प्रशासनाने तपासणी करणे आवश्यक होते. खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणचे डेब्रिज हटवण्यात आले असून काही ठिकाणी ते आजही पदपथावर आहे. खोदकाम झालेल्या जागेवर डांबरीकरण झालेले नसून केबल उघड्यावर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेने विक्रम बार ते प्लॉट १५ वरील शिवम सोसायटीलगतच्या महावितरणच्या डीपीपर्यत जे खोदकाम केले आहे, त्यावर तात्काळ डांबरीकरण करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. तसेच महावितरणच्या डीपीच्या जागेवर केबल पदपथावरच उंचवटा करून टाकल्याने स्थानिक रहिवाशी या ठिकाणी ये-जा करताना अडखळून पडतात. त्यामुळे या केबल भूमिगत करुन पदपथ समान पातळीवर करण्याचे निर्देश देवून स्थानिक जनतेला दिलासा द्यावा. केवळ निवेदन फॉरवर्ड न करता काम झाले आहे अथवा समस्येचे निवारण झाले आहे अथवा नाही याची खातरजमा करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

