• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 20, 2026

१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान
नवी मुंबई : फेब्रुवारी 2026 मध्ये झिम्बावे आणि नामिबिया येथे झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे उपकर्णधारपद भूषविणारे भारतीय संघातील यष्टिरक्षक – फलंदाज श्री. अभिज्ञान अभिषेक कुंडू यांचा नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते सभागृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती श्री. अशोक पाटील, सभागृह नेते श्री. सागर नाईक, विरोधी पक्षनेते श्री.विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती श्री. गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री. राजू मढवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांचे प्रशिक्षक श्री.चेतन जाधव यांनाही सन्मानीत करण्यात आले.
सभागृह नेते श्री. सागर नाईक यांनी मांडलेल्या अभिनंदनपर प्रस्तावास विरोधी पक्षनेते श्री.विजय चौगुले यांनी अनुमोदन दिले. आयुक्त, उपमहापौर व महापौरांनीही यावेळी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली. कोपरखैरणे येथे वास्तव्यास असलेला अभिज्ञान अभिषेक कुंडू यांनी 19 वर्षाखालील भारतीय संघाचा उपकर्णधार तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक, फलंदाज म्हणून भारतीय संघासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळताना एकूण 4 अर्धशतके करुन मोलाचे योगदान दिले. अंतिम सामन्यात इंग्लड विरूध्द विजयश्री मिळवून अंडर 19 विश्वचषक जिंकणा-या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत अभिज्ञान यांनी संपूर्ण विश्वचषक मालिकेत 239 धावा केल्या असून संघातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे.
यापूर्वी सन 2025 मध्ये पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेतही त्यांनी जलद द्विशतकाचा विश्वविक्रम प्रस्थापित करीत नाबाद 209 धावा आपल्या नावावर नोंदवल्या असून भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
भारतीय संघामध्ये उपकर्णधार म्हणून आपले स्थान भक्कम करणारा आणि नवी मुंबई शहराचे नाव देशात व जगात उज्ज्वल करणारा हा उदयोन्मुख खेळाडूस नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महासभेत सन्मानीत करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Previous Post

राज्य बँकेची `दीर्घ प्रलंबित थकबाकी निवारण योजना २०२६’ लागू

Next Post

महावितरणने रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
महावितरणने रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

महावितरणने रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com