• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, May 31, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2026

नेरूळ सेक्टर आठमध्ये खडीकरणाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर आठमध्ये खडीकरणाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठ परिसरात एम.एस.ई.डी.सी.एल.सीने विद्युत केबल्स टाकण्यासाठी रस्त्यावर पदपथालगत खोदकाम केलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांनी महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.

या कामाविषयी २० मार्च २०२६ रोजी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करुनही कामास अजूनही सुरुवात न झाल्याने कामाविषयीचे निखील मांडवे यांनी पुन्हा एकवार लेखी स्मरणपत्र विभाग अधिकाऱ्यांना दिले आहे.

फेब्रुवारी महिन्यात एम.एस.ई.डी.सी.एल.सीने विद्युत केबल्स टाकण्यासाठी नेरूळ सेक्टर आठ परिसरातील रस्त्यावर पदपथालगत खोदकाम केलेले आहे. खोदकाम करुन महिना लोटला या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून अद्यापि खोदकामाच्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले नाही. केवळ खडीकरण करुन काम गेले काही दिवस तसेच सोडून देण्यात आलेले आहे. या खोदकामासाठी महापालिका प्रशासनाला एम.एस.ई.डी.सी.एल.सीकडून शुल्क निश्चितच जमा केलेले असणार. या खोदकामामुळे त्या त्या ठिकाणच्या परिसराला बकालपणा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीटीसह अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर खाचखळगे निर्माण झालेले आहेत. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारालाच बकालपणा आल्याने स्थानिक रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा खडीवरुन दुचाकी व चारचाकी वाहने गेल्यास खडीकरणातील दगडी इतरत्र उडत आहे. समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहिवाशांना होत असलेला त्रास पाहता संबंधितांना नेरूळ सेक्टर आठमधील महावितरणने खोदकाम केलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी निखील मांडवे यांनी केली आहे.

Previous Post

जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सवाचे आयोजन

Next Post

नवी मुंबईतील पोर्टा केबिनचे लोकार्पण करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नवी मुंबईतील पोर्टा केबिनचे लोकार्पण करण्याची युवा सेनेची मागणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन

नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com