स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्याने विविध विकासकामांना वेग देण्यात येत असून बेलापूर गाव आता स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल करत आहे. गावामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे हाती घेण्यात आली आहेत व काही कामे पूर्णत्वास जात आहेत.
बेलापूर गावांमध्ये अमृतेश्वर तलावासमोरील सभामंडपाच्या आवारात काँक्रीटीकरण (रु. ३५ लाख रुपये), बेलापूर गाव येथे अमृतेश्वर तलावासमोर सभामंडप (१५ लाख रुपये), बेलापूर गाव येथे ब्रिज खालून रस्ता तयार करणे (७५ लाख रुपये), बेलापूर गाव सेक्टर – २० येथे भाजी मार्केट (५० लाख रुपये), बेलापूर येथील मच्छीमार्केट लगत संरक्षण भिंत उभारणे (२४ लाख रुपये), बेलापूर विभागातील बेलापूर गाव येथे क्रीडा संकुल उभारणे व इतर समाज उपयोगी कामे करणे (१८ कोटी रुपये), बेलापूर गाव येथे भूखंड क्र. बी ३२, बी ३३ शेजारील जागेवर खेळाचे मैदान, पार्किंग इमारत, तलावाचे शुशोभीकरण, गाळे बांधणे, बहुद्देशीय इमारत, मार्केट उभारणे, बेलापूर गावातील कुस्तीच्या मैदानावर आधुनिक क्रीडा संकुल उभारणे, बेलापूर येथील शहाबाज – बेलापूर रेल्वे पटरी ते सेक्टर – १५ रेजेन्सी टॉवर पर्यंतच्या नाल्याच्या दोन्ही बाजूस कॉक्रिटीकरण करून अनुषंगिक कामे करणे, न.मुं.म.पा. प्रथम संदर्भ रुग्णालय बेलापूर येथील माता बाल रुग्णालयास BS VI FM २.६ CR ३३५० B Type Without AC अँम्बुलंस पुरविणे (१६ लाख रुपये), न.मुं.म.पा. प्रथम संदर्भ रुग्णालय बेलापूर येथील माता बाल रुग्णालय यांना आय.सी.यु. व्हेंटीलेटर पुरविणे (१६ लाख रुपये), न.मुं.म.पा. शाळा क्र. १ बेलापूर गाव या शाळेला जिओमेट्रीकल बॉक्स (रजि. ट्रेडमार्क) हे अध्यायन साहित्य देणे (२ नग) (२.४० लाख रुपये ), न.मुं.म.पा. शाळा क्र. १ बेलापूर गाव या शाळेला मायक्रोसॉफ्ट बॉक्स (रजि. ट्रेडमार्क) हे अध्यायन साहित्य देणे (२ नग) (२.४० लाख रुपये), बेलापूर मतदार संघातील शहाबाज, बेलापूर- सेक्टर २० येथे ओपन जिम उभारणे व इतर स्थापत्य कामे करणे (२० लाख रुपये), बेलापूर विभागातील किल्ले गावठाण येथे सीट आऊट लगत स्टील रेलिंग उभारणे (७ लाख रुपये), बेलापूर विभागातील नागा गणा पाटील उद्यान येथे निवारा शेड उभारणे (२५ लाख रुपये), बेलापूर मतदार संघातील आयकर कॉलनी, सीबीडी सेक्टर २१, काँक्रीटीकरण करणे व इतर स्थापत्य कामे करणे (३५ लाख रुपये), बेलापूर विभागातील सेक्टर १५, येथील जॉगिंग ट्रक शेजारी साई विहार व मारुती पॅराडाईस समोर ओपन जिम व इतर स्थापत्य काम करणे (२० लाख रुपये), बेलापूर सेक्टर – १५ येथील ब्रिज खालील भूखंडाचे सौंदर्यकीकरण करणे (४ कोटी रुपये), रस्त्यांचे मजबुतीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट्स, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण तसेच डिजिटल सुविधा यांसारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आमदार मंदाताई म्हात्रे या नेहमीच स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असून बेलापूर गावाला आदर्श स्मार्ट व्हिलेज बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या विकासकामांमुळे बेलापूर गाव लवकरच एक आदर्श व आधुनिक गाव म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

