• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, April 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 18, 2026

नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७ च्या मालमत्ता कराची ई-बिले आता ऑनलाइन उपलब्ध

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७ च्या मालमत्ता कराची ई-बिले आता ऑनलाइन उपलब्ध
व्हाट्सअँप चॅटबॉट व संकेतस्थळाद्वारे नागरिकांना बिल डाउनलोड करण्याची सुविधा
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कराची ई-बिले तयार करण्यात आली असून, नागरिकांना आपले मालमत्ता कराचे बिल व्हाट्सअॅप चॅटबॉट तसेच महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून केवळ काही मिनिटांत पाहता येईल, डाऊनलोड करता येईल आणि त्यासोबतच बिलाचा भरणा करता येणार आहे.
महापालिकेकडून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने ही डिजीटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाईन पद्धतीने देखील घरपोच बिल वाटप करण्यात येणार आहेत. मात्र ई-बिलमुळे नागरिकांना आता ऑफलाइन बिलाची प्रतीक्षा करण्याची गरज नसून, घरबसल्या कोणत्याही वेळी आपले बिल मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत तसेच पहिल्या व तिस-या शनिवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यरत आहे.
व्हाट्स अॅप चॅटबॉट द्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया:
नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमधून ८२९१९२०५०४ या क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवावा.
त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून आपल्या पसंतीची भाषा निवडावी.
पुढे “Pay Your Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक (Property ID) प्रविष्ट करावा.
मालमत्ता क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित मालमत्तेची सविस्तर माहिती जसे की मालकाचे नाव, मालमत्तेचा पत्ता इत्यादी तपशील स्क्रीनवर दिसतील.
तसेच संबंधित आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचे मालमत्ता कराचे बिल PDF स्वरूपात उपलब्ध होईल.
या PDF वर क्लिक करून बिल पाहता आणि डाऊनलोड करता येईल.
“Pay Now” पर्याय निवडून त्वरित भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
अधिकृत संकेतस्थळाद्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया:
नागरिकांनी आपल्या ब्राऊझरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in) भेट द्यावी.
संकेतस्थळावरील “Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर नागरिकांनी आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक प्रविष्ट करावा.
यानंतर संबंधित मालमत्तेची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.
पुढे “Bill” या पर्यायावर क्लिक करून नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलाची प्रत ऑनलाइन स्वरूपात पाहता तसेच डाऊनलोड करता येईल.
“Pay Now” या पर्यायावर क्लिक करून थेट भरणा करता येईल.
मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या सुविधा:
नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करता येणार असून त्यामध्ये पुढील पर्यायांचा समावेश आहे: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट, QR कोड
———————————————
नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी सातत्याने डिजिटल माध्यमांचा वापर वाढवत आहे. मालमत्ता कराची ई-बिले व्हाट्सअॅप चॅटबॉट आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना केवळ काही मिनिटांत आपले बिल प्राप्त करून त्याचा भरणा करता येणार आहे. या सुविधेमुळे वेळेची बचत होणार असून, नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक वापर करून निर्धारित कालावधीत मालमत्ता कर भरावा आणि शहराच्या विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post

डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीकडून सव्वा तीन करोड थकबाकी वसूल करणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com