• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, April 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 16, 2026

डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीकडून सव्वा तीन करोड थकबाकी वसूल करणार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीकडून सव्वा तीन करोड थकबाकी वसूल करणार

मनसेच्या दणक्यानंतर नवी मुंबई महापालिकेला आली जाग, मनसेमुळे पालिकेचा महसूल वाढणार
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईत खासगी क्रीडा संकुले, स्पोर्ट्स क्लब, स्पोर्ट्स अकॅडमी यांची सदस्यत्वता घेणे म्हणजे श्रीमंतांची मक्तेदारी झाली आहे. अशा स्पोर्ट्स क्लबची सदस्यतत्व घेण्यासाठी सदर संस्थांकडून लाखोंची मेंबरशिप फी आकारण्यात येते. संपूर्णपणे व्यावसायिक बनलेल्या अशा क्रीडा अकादमींना महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे व्यावसायिक / अनिवासी मालमत्ता कर आकारणे क्रमप्राप्त आहे. परंतू नवी मुंबईतील काही क्रीडा अकादमींवर महापालिका मेहेरबान असल्याने अशा क्रीडा अकादमींना मालमत्ता विभागातर्फे नियमबाह्य निवासी मालमत्ता कर आकारला जात होता. त्यामुळे महानगरपालिकेचा महसूल बुडत होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार करुन संबंधित खाजगी क्रीडा संकुलांना नियमानुसार अनिवासी/ व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्याची मागणी केली होती. तसेच भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यापासून ते आजपर्यंत चे अनिवासी मालमत्ता कर आकारण्यात यावे अशी मागणी सविनय म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती. याबाबत सविनय म्हात्रे यांनी वारंवार पालिका आयुक्त, उपायुक्त यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची माहिती संबंधितांना देण्यात आली. अखेर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला जाग आली असून आयुक्तांच्या निर्देशानंतर डी. वाय. पाटील खाजगी क्रीडा संकुलांच्या मालमत्ताचे पुनर्वालोकन करण्याचे निर्देश आयुक्तांकडून मालमत्ता कर विभागाला देण्यात आले. त्यानुसार डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी या संस्थेला अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्यात आला असून त्यामुळे वार्षिक जवळपास ५४ लाखांची वाढ मालमत्ता करात करण्यात आली असून नियमानुसार जवळपास ३ करोड २३ लाखांची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.
नेरुळ येथील डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी या खासगी क्रीडा संस्थेत सुसज्ज अशी व्यायामशाळा, तरणतलाव, कॅफे, हॉटेल असून याचा पूर्णपणे व्यावसायिक वापर केला जात असून सदस्यत्वासाठी नागरिकांकडून लाखोंची रक्कम आकारली जाते. मनसेच्या तक्रारीनंतर मागील वर्षभरात मालमत्ता कर विभागातर्फे डी वाय पाटील संस्थेला मालमत्ता कर पुनार्वलोकन संदर्भात ७-८ नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मनसेच्या सततच्या रेट्यामुळे मालमत्ता कर विभागातर्फे अनिवासी कर आकारण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही मागील वर्षभरापासून महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीबाबतीत बोटचेपीधोरण अवलंबत होते. त्यामुळे महानगरपालिकेचा महसूल बुडवला जात असल्याचा आरोप मनसेचे उपशहर सविनय म्हात्रे यांनी केला आणि या प्रकरणाबाबत सतत पाठपुरावा चालू ठेवला होता .
मनसेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून महानगपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेस अनिवासी/ व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्यात आला असून त्यामुळे वार्षिक ५४ लाखांची वाढ मालमत्ता करात आकारण्यात आली असून जवळपास ३ करोड २३ लाख रुपयांची थकबाकी आकारण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे. आता ही थकबाकी लवकरात लवकर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी या संस्थेकडून वसूल करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मनसेचे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला आहे.

Previous Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्याने बेलापूर गाव स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com