सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
उरण : तळोजा एम. आय.डी.सी मधील साफोर्ड ली या कंपनीतील कामगारांनी अगोदरच्या दोन संघटनांना राजीनामा देवून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेवर विश्वास ठेवला. या विश्वासाला तडा न जाता संघटनेने कामगारांना तीन वर्षासाठी तब्बल ११००० रुपयांची पगारवाढ करण्याचा करार केला. या करारनाम्यानुसार कामगारांना एक ग्रॉस सॅळरी पगार, मेडिक्लेम पॉलीसी व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करत असतांना स्थानिक भूमिपुत्र कामगारांना सन्मान पूर्वक जगण्यासाठी त्यांना न्याय देण्याचे काम सातत्याने करत असतात. संघटनेतर्फे सन २०२६ मधील हा पाचवा पगारवाढीचा करार २१ एप्रिल रोजी करण्यात आला. तब्बल ११ हजार रुपये पगारवाढ मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कामगारांनी संघटनेचे आभार मानले.


