• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, April 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 22, 2026

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना २४ एप्रिलपर्यंत कोठडी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड लाच घेताना रंगेहात अटक

नवी मुंबई : कंत्राटदाराकडून लाच सघेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना बेलापूर सत्र न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना न्यायालयात हजर केले. प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे, संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे तसेच इतर संभाव्य संबंधित व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक असल्याचे नमूद करत सरकारी पक्षाने कोठडीची मागणी केली होती.
डॉ. गायकवाड यांना मंगळवारी, २१ एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनात कंत्राटदाराकडून ४२ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने सापळा रचून पकडले होते. ऐरोली विभागातील अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी वाहने उपलब्ध करून देणाऱ्या कंत्राटदाराचे सुमारे २१ लाख रुपयांचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी आणि धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी ही रक्कम मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंत्राटदाराच्या तक्रारीची पडताळणी करून एसीबीने कारवाई केली.
अटकेनंतर एसीबीच्या पथकाने गायकवाड यांच्या निवासस्थानी रात्रभर झडती घेतली. या झडतीत ३८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे अडीच लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच गायकवाड व त्यांच्या पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक अशा दोन सदनिकांची कागदपत्रे मिळाली आहेत. या मालमत्तेचे स्रोत, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाशी त्याचा संबंध याबाबत तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

साफोर्ड कंपनीतील कामगारांना ११ हजार रुपयांची पगारवाढ

Next Post

‘उद्धव खान’ लाचार माणूस असल्याची मंत्री नितेश राणे यांची टीका

Next Post
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून सखोल आढावा

‘उद्धव खान’ लाचार माणूस असल्याची मंत्री नितेश राणे यांची टीका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com