• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 6, 2026

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

adminbyadmin
in मुंबई
0
एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जलवाहतूक सेवा अधिक पारदर्शक,सुलभ आणि प्रवासी केंद्रीत करण्यासाठी बैठक

नव्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवण्याचे मंत्री राणेंचे निर्देश

मुंबई  : मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि एकात्मिक ऑनलाईन तिकीट वितरण व विक्री प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

जलवाहतूक सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रवासी-केंद्रित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे
मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह बंदरे, परिवहन व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, मुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी तसेच संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांसाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, जेणेकरून सेवा अधिक परिणामकारक पद्धतीने राबविता येईल, असेही ते म्हणाले.

जलवाहतूक सेवा ही भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याने या नव्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावी, अशा सूचना मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.

जलवाहतूक सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Previous Post

पुनर्बांधणीमुळे होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी

Next Post

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची कोलकात्यात चार गोळ्या घालून हत्या

Next Post
भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची कोलकात्यात चार गोळ्या घालून हत्या

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची कोलकात्यात चार गोळ्या घालून हत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com