• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, July 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 9, 2026

मुसळधार पावसातही महापौर सुजाताताई पाटील नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी ‘ऑन दि स्पॉट’ हजर

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुसळधार पावसातही महापौर सुजाताताई पाटील नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी ‘ऑन दि स्पॉट’ हजर

नवी मुंबईतील तरुणाईकडून सोशल मीडियावर महापौरांच्या कार्याची प्रशंसा

आजवरच्या महापौरांना नाही जमले ते कुकशेतच्या सूनबाईने करुन दाखविले

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपून काढले असून विविध ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. या दुर्घटनातही नवी मुंबईकरांसाठी एकच समाधानाची बाब म्हणजे दिघा ते बेलापूरदरम्यान कुठेही काहीही घडल्यास शहराच्या महापौर सौ. सुजाताताई पाटील या नवी मुंबईकरांच्या मदतीसाठी ‘ऑन दि स्पॉट’ हजर असतात, हीच बाब नवी मुंबईतील तरुणाईला भावली असून सोशल मीडियावर महापौर सुजाताताई पाटील यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरु आहे. जे आजवरच्या महापौरांना जमले नाही ते कुकशेतच्या सूनबाईने करुन दाखविल्याची प्रशंसा सर्वत्र होत आहे.

पावसाळी कालावधीतील क्षेत्रीय स्तरावरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा फिल्डवर जाऊन घेताना नवी मुंबईच्या महापौर सुजाताताई पाटील यांनी शहाबाज बेलापूर व जुहूगाव वाशी या ठिकाणी घडलेल्या इमारत दुर्घटना स्थळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तेथील रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दिलासा देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

४ जुलै रोजी सेक्टर १९ शहाबाज गाव, बेलापूर येथील अविघ्न सोसायटी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब पडण्याची घटना घडलेली आहे. या इमारतीमध्ये १७ कुटूंब वास्तव्यास होती. सदर घटनेमध्ये कोणतीही जिवित हानी झाली नसून या कुटूंबांना महापालिकेच्या वारकरी भवन, बेलापूर येथील तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यापैकी काही कुटुंबे त्यांच्या नातेवाईकांकडे गेली असून एक कुटुंब निवारा केंद्रामध्ये आहे. सदर इमारतीच्या ठिकाणी भेट देत तेथे उपस्थित असलेल्या इमारतीतील रहिवाशांशी महापौर सुजाताताई पाटील यांनी संवाद साधला. यावेळी रहिवाशांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावर महापौर सुजाताताई पाटील यांनी इमारतीची महापालिकेमार्फत स्ट्रक्चरल तपासणी झाल्यानंतर घरामध्ये असलेले त्यांचे आवश्यक सामान काढण्यासाठी परवानगी देता येईल असे सांगितले. जेणेकरुन इमारतीत गेल्यानंतर आणखी काही दुर्घटना घडायला नको. याकरिता सर्व रहिवाशांनी सहकार्य करावे असेही आवाहन महापौर सुजाताताई पाटील यांनी केले. महापालिकेने तत्परतेने स्ट्रक्चरल तपासणी करुन घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या ठिकाणी उपायुक्त डॉ.अमोल पालवे व सहा.आयुक्त प्रशांत नेरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सदर इमारतीचे गेट सिलबंद करण्यात आले असून सुरक्षा रक्षक ठेवण्यात आलेला आहे.    

अशाचप्रकारे ५ जुलै रोजी सेक्टर-११ जुहूगाव,वाशी येथील गीता अपार्टमेंट या तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाहेरील स्लॅब ग्रीलसह रस्त्यावर कोसळून राजेश शेट्टी ह्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटना स्थळाला महापौर सुजाताताई पाटील यांनी भेट देत इमारतीचा सर्व पडिक भाग निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. प्रामुख्याने बाहेरील ग्रील त्वरित काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे व कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चौडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

महापे एमआयडीसी येथील पोलीस चौकीसमोर रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचलेल्या ठिकाणाचीही पाहणी करत त्याठिकाणी सुरु असलेल्या जेसीबीने नाल्याचे पात्र मोठे करण्याच्या कामाला वेग दयावा असे महापौर सुजाताताई पाटील यांनी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त भरत धांडे यांना निर्देश दिले. ठाणे बेलापूर रोडवरील स्थितीची दिघ्यापर्यंत पाहणी करत ग्रीनवर्ल्ड नाल्यातील प्रवाहाचीही महापौर सुजाताताई पाटील यांनी उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह पाहणी केली.

पाहणी दौऱ्यात तीन दिवसातील मुसळधार पावसात मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना सर्वत्र घडल्या असून पडलेली झाडे उचलून नेण्याचे काम जलद गतीने करावे असेही निर्देशित करण्यात आले. नवी मुंबईकर नागरिकांनी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने आत्यंतिक महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच झाडाखाली उभे राहू नये व झाडाखाली आपली वाहने उभी करु नयेत. त्याचप्रमाणे अडचणीच्या प्रसंगी मदत कार्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी १८००२२२३०९ / १८००२२२३१० या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

मराठी शिकण्याची अमराठी चालकांची उत्सुकता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com