• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2026

राज मेहरोल वाल्मीकी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
राज मेहरोल वाल्मीकी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

अनंतकुमार गवई :
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार राज मेहरोल वाल्मिकी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे राज्यभरातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून स्वागत होत असून, त्यांच्या संघटनात्मक कार्याची व सामाजिक बांधिलकीची ही योग्य दखल असल्याची भावना वरिष्ठ पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
राज वाल्मिकी यांनी अनुसूचित जाती विभागाच्या प्रशासन व मुख्यालयीन कामकाजाची जबाबदारी सलग चार वर्षे अत्यंत जबाबदारीने सांभाळली आहे. या कालावधीत त्यांनी संघटनात्मक समन्वय, प्रशासकीय नियोजन, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले. सामाजिक न्याय, अनुसूचित जातींचे सक्षमीकरण, युवकांचा सहभाग आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने भूमिका घेत पक्षाचे काम केले आहे.
नियुक्तीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज मेहरोल वाल्मीकी म्हणाले, माझ्यावर विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने कार्य करीन. राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन.
यावेळी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष अनिरुध वनकर यांच्या मनःपूर्वक आभार मानत, राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्यासाठी असल्याचे सांगितले.

Previous Post

अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्याच्या आश्वासित प्रगती योजनेेतील त्रुटी दूर करा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com