• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2026

अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्याच्या आश्वासित प्रगती योजनेेतील त्रुटी दूर करा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

महाराष्ट्र कर्मचारी युनियनची महापालिका आयुक्तांकडे मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्याच्या आश्वासित प्रगती योजनेेतील त्रुटी दूर करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागात ड्रायव्हर ऑपरेटर (वेतनश्रेणी 5200-20200 (ग्रेड वेतन रु. 2400/-) या पदावर एप्रिल 2007 पासून कार्यरत आहेत. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या निकषांनुसार सन 2017 पासुन सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी (वेतनश्रेणी एस-13, 9300-34800 (ग्रेड वेतन रु. 4200/-) या पदाची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे क्रमप्राप्त होते. संदर्भ क्र. 2 वरील शासन निर्णयानुसार सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदाची वेतनश्रेणी (वेतनश्रेणी एस- 13, 9300-34800 (ग्रेड वेतन रु. 4200/-) इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र. 1 वरील शासन निर्णयाच्या आधारे सन 2019 मध्ये नमुंमपा अग्निशमन विभागासाठी पदभरती करण्यात आली असुन संबंधित नवनियुक्त कर्मचाऱ्यांस उक्त शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये वेतनश्रेणी लागु करण्यात आली आहे. त्या निकषावर या कर्मचाऱ्यांनादेखील संदर्भ क्र. 1 मधील शासन निर्णयाच्या आधारे वेतनश्रेणी निश्चित करुन सन 2017 पासुन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे अनिवार्य होते, असे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
नमुंमपा अग्निशमन विभागात कार्यरत असलेले एप्रिल 2007 मध्येच रुजु झालेले अग्निशामक यांना संदर्भ क्र. 2 अन्वये 22 सप्टेबर 2017 नुसारच आश्वासित प्रगती योजनेचा लाभलागु करुन त्याबाबतची थकबाकीची रक्कमही संबंधित अग्निशामकांना अदा करण्यात आली आहे. तथापि, सन 2017 च्या ऐवजी संदर्भ क्र. 3 वरील शासन निर्णयाच्या आधारे सन 2021 पासुन ड्रायव्हर ऑपरेटर या संवर्गातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना निश्चित करुन लाभ लागु करण्यात आला आहे. यामुळे ड्रायव्हर ऑपरेटर या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासन निर्णय क्र. नमुम/1217/प्र.क्र.177/17/नवि-28, दिनांक 22 सप्टेंबर 2017 रोजीचा नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभाग सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2017 ला मान्यता मिळाली असुन त्यामध्ये ड्रायव्हर ऑपरेटर या संवर्गातील पदासाठी पदोन्नतीने साखळीतील पुढील पद हे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी असुन त्याची वेतनश्रेणी वेतन रु. 9300-34800 (ग्रेड पे वेतन रु. 4200) अशी आहे. त्यानुसार दिनांक 22 सप्टेंबर 2017 पासुन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ निश्चित करुन ड्रायव्हर ऑपरेटर या संवर्गातील संबंधित कर्मचाऱ्यांना नैसर्गिक न्याय मिळणे आवश्यक आहे. अग्निशमन विभागातील ड्रायव्हर ऑपरेटर या संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा अन्याय होत असून त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताची महापालिकेची जोपासणा करणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

‘पोलीस’च्या लाल पाटीचा रुबाब आता महागात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com