• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, August 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 19, 2026

डास प्रतिबंधासाठी महापौर सुजाता पाटील यांची थेट मैदानात उतरून पाहणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
डास प्रतिबंधासाठी महापौर सुजाता पाटील यांची थेट मैदानात उतरून पाहणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@mail.com

आरोग्य यंत्रणेला गतिमान करण्यासोबत नागरिकांच्या आरोग्याची काळजी

कुकशेतमध्ये विशेष धुरीकरण मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी

नवी मुंबई : नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी महापौर श्रीमती सुजाता सुरज पाटील यांनी प्रशासनाच्या कामकाजावर केवळ कार्यालयातून लक्ष न ठेवता थेट नागरिकांच्या परिसरात जाऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. कुकशेत परिसरात सुरू असलेल्या विशेष धुरीकरण मोहिमेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली.

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या नियोजनानुसार १७ ते २२ ऑगस्टदरम्यान शहरात डास प्रतिबंधात्मक विशेष रासायनिक धुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

डासांमुळे होणाऱ्या आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांचे सहा गटांमध्ये नियोजन केले आहे. पहिल्या दिवशी सीबीडी, वाशीगाव आणि दिघा परिसरात धुरीकरण करण्यात आले. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी से-४८, कुकशेत, पावणे आणि घणसोली या भागांत विशेष धुरीकरण करण्यात आले.

या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी कुकशेत येथे भेट देऊन महापौर सुजाता पाटील यांनी सुरू असलेल्या धुरीकरणाच्या कामाची बारकाईने पाहणी केली. परिसरातील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेताना त्यांनी संबंधित यंत्रणेकडून धुरीकरणाच्या कार्यवाहीबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी करण्याची महापौरांची कार्यपद्धती नागरिकांच्या प्रश्नांबाबत असलेली त्यांची संवेदनशीलता अधोरेखित करणारी ठरत आहे.

महापौरांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक गांभीर्याने आणि प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळत असल्याचे चित्र आहे. केवळ आजाराची लक्षणे दिसल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी डासांची उत्पत्ती आणि प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक पातळीवरच कार्यवाही करण्यावर भर देण्यात येत आहे.

दरम्यान, घणसोली परिसरातील धुरीकरण मोहिमेची एफ प्रभाग समितीच्या अध्यक्षा श्रीमती ललिता घनश्याम मढवी यांनीही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यामुळे संबंधित भागातील प्रतिबंधात्मक कामांवर स्थानिक पातळीवरही देखरेख ठेवली जात असल्याचे दिसून आले.

१९ ऑगस्ट रोजी करावे, नेरुळ-२, तुर्भे, नोसीलनाका आणि कातकरीपाडा या भागांत, २० ऑगस्ट रोजी शिरवणे, सानपाडा आणि इलठणपाडा येथे, २१ ऑगस्ट रोजी नेरुळ-१, जुहुगाव, महापे आणि चिंचपाडा येथे, तर २२ ऑगस्ट रोजी इंदिरानगर, खैरणे, राबाडा आणि ऐरोली परिसरात विशेष धुरीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून धुरीकरणासोबतच डास प्रतिबंधात्मक इतर आवश्यक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. मात्र, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. घरात किंवा घराभोवती पाणी साचून राहणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या निर्माण होणार नाहीत, यासाठी नियमितपणे परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महापौर सुजाता पाटील यांनी केले.

नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांवर प्रशासनाला दिशा देतानाच प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाची पाहणी करण्याची महापौर सुजाता पाटील यांची कार्यशैली विशेष लक्षवेधी ठरत आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांना प्राधान्य देत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न नवी मुंबईतील आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख बनविण्यास निश्चितच हातभार लावणारा आहे.

Previous Post

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com