• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2026

ऑगस्ट अर्धा संपला; महापालिकेची शिष्यवृत्ती अजून कागदावरच!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिने उलटले

पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अर्जच वितरित नाहीत

नवी मुंबई : आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा, यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून पहिलीपासून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले, ऑगस्टचा अर्धाही संपला, तरी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीचे अर्जच महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या अर्जाची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही प्रक्रिया अद्याप सुरूच झालेली नाही. परिणामी, पात्र विद्यार्थ्यांना अर्ज कधी मिळणार, अर्ज कधी भरायचा आणि प्रत्यक्ष शिष्यवृत्ती कधी मिळणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक आधार

नवी मुंबई महापालिकेची ही योजना हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. मागील उपलब्ध आकडेवारीनुसार २०२४-२५ मध्ये ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांना सुमारे २८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षीही मोठ्या संख्येने विद्यार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू करण्यासाठीच ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असेल, तर प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

इतर शिष्यवृत्ती प्रक्रिया सुरू; महापालिका मात्र सुस्त?

राज्याच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाइन अर्ज आणि अर्जस्थिती तपासण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. समाजकल्याण विभागाच्या अधिकृत पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या अर्जांची स्थिती तसेच नवीन आणि नूतनीकरण अर्जांची माहिती नियमित अद्ययावत केली जाते. अशा परिस्थितीत नवी मुंबई महापालिकेच्या स्वतंत्र शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, प्रशासन गप्प

शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांसाठी केवळ कागदावरील योजना नाही. अनेक कुटुंबांसाठी शाळा-महाविद्यालयाचे शुल्क, पुस्तके, गणवेश, प्रवास आणि इतर शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी या आर्थिक मदतीचा मोठा आधार असतो.

मग शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने का केले नाही? अर्ज छपाई आणि वितरणात विलंबाचे नेमके कारण काय? यंदा किती विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे? यासाठी किती निधीची तरतूद केली आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

‘अर्जच नाहीत, मग शिष्यवृत्ती कधी?’

एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते आणि दुसरीकडे त्याच योजनेचा अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, ही बाब गंभीर असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या महादेव पवार यांनी केला आहे.

महापालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे गांभीर्य कधी समजणार?

आता तरी प्रशासनाने शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने उपलब्ध करून देऊन अर्ज भरण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे. तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्ती वितरणाची संभाव्य तारीखही जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. ऑगस्ट अर्धा संपला; महापालिकेची शिष्यवृत्ती योजना मात्र अजूनही अर्जाच्या प्रतीक्षेतच आहे!

Previous Post

पप

Next Post

पालकमंत्र्यांचा दणका; गणेशोत्सवापूर्वी नवी मुंबईतील खड्डे बुजणार!

Next Post
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालकमंत्र्यांचा दणका; गणेशोत्सवापूर्वी नवी मुंबईतील खड्डे बुजणार!

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

तळोजा एमआयडीसीला चौकी नव्हे, २४ तास कार्यरत पूर्ण पोलीस ठाण्याची गरज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com