• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, August 29, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2026

राज्य बँकेच्या आर्थिक सामर्थ्यावर शासनाचे शिक्कामोर्तब

adminbyadmin
in मुंबई
0
यूपीआय व्यवहार स्वीकारणारी राज्य बॅंक ठरली देशातील पहिली शिखर बँक

शासन व्यवहारासाठी निवड झालेली राज्यातील एकमेव सहकारी बँक

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

          महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., ही राज्यातील ५७४६ कोटींचे नक्त मुल्य (नेटवर्थ) असणारी बँक आहे.  राज्यातील खाजगी, राष्ट्रीयकृत व सहकार क्षेत्रातील सक्षम बँकांना शासनाचे व्यवहार सांभाळण्याकरीता जाहिर करण्याची प्रथा आहे. २० ऑगस्ट २०२६ रोजी राज्य शासनाने जाहीर केलेल्या महत्वपूर्ण शासन निर्णयाप्रमाणे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासकीय कार्यालयांचे बँकिंग विषयक तसेच सार्वजनिक उपक्रम व महामंडळाकडील अतिरिक्त निधिच्या गुंतवणूकीसाठी या बँकांना पात्रता धारण करणाऱ्या बँका म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे. यामध्ये अनुसूचित वाणीज्य बँकांच्या यादीमध्ये इतर अकरा बँका असून त्यामध्ये एच.डी.एफ.सी, आय.सी.आय.सी.आय बँक, एक्सीस बँक इत्यादींचा समावेश असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

सहकारी बँकांच्या यादीमध्ये फक्त आणि फक्त राज्य सहकारी बँकेचे नांव असून इतर कोणत्याही सहकारी बँकांना पात्रता धारण करता आलेली नाही. यामध्ये राष्ट्रीय बँकेसह व्यापारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेस मिळालेले स्थान अभिमानास्पद आहे. या निर्णयाचे आणखी एक वैशिष्टे म्हणजे शासनाने केवळ आकारमान, भांडवली पर्याप्तता आणि नियामक निकषाचे पालन करणाऱ्या या बँकांचाच या यादीत समावेश केलेला आहे. त्यामुळे या पात्र निकषामध्ये राज्य सहकारी बॅंकेचा या यादीतील समावेश हा केवळ बँकेच्या पात्रतेचा विषय नसून सहकारी बँकेची आर्थिक क्षमता, विश्वासर्हता आणि संस्थात्मक सामर्थ्य यांना मिळालेली शासन मान्य पावती आहे.

राज्याच्या आर्थिक विकासात सहकारी बँकिंग क्षेत्राची भूमिका अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने या निर्णयाचे महत्व असून यामुळे नवे दालन खुले झाले आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक सामर्थ्यावर शासनाने केलेले शिक्कामोर्तंब आहे.

राज्य सहकारी बँकेची ३१ मार्च २०२६ अखेरीस आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे.

अ. क्र. तपशील आदर्श निकष दि. ३१ मार्च २०२६ अखेरील आर्थिक स्थिती
१ सीआरएआर किमान ९% १८.५०
२ नेटवर्थ किमान रु ५ लाख रु ५७४७ कोटी
३ नेटवर्थचे सरासरी खेळते भांडवलाशी प्रमाण किमान ४% ११.८६%
४ यील्ड ऑन अॅसेटस् जादा तेवढा चांगला ७.२९%
५ कॉस्ट ऑफ फंड कमी तेवढा चांगला ५.६१%
६ नेट इंटरेस्ट मार्जिन ३% १.६८%
७ रिटर्न ऑन अॅसेटस् १% १.४५%
८ प्रोव्हिजन टू कव्हरेज रेशो ७०% ८१.९१%
९ कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट १.५०% ०.४०%
१० ग्रॉस एन.पी.ए जास्तीत जास्त १०% ८.४४%
११ नेट एन.पी.ए. जास्तीत जास्त ५% १.६४%
१२ प्रती कर्मचारी व्यवहार जादा तेवढा चांगला रु ६८ कोटी
Previous Post

सीएसएमटी परिसरातील बेकायदा दारू-गुटखा विक्रीवर प्रशासनाने आता ‘ग्राउंडवर कारवाई ’ दाखवावी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com