• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2026

आशा सेविकांच्या हक्कासाठी गणेश नाईक मैदानात!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आशा सेविकांच्या हक्कासाठी गणेश नाईक मैदानात!

जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

५२९ आशा सेविकांना साडेसात हजारांचा विशेष नागरी भत्ता देण्याचे निर्देश

जनता दरबारात प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने प्रशासनाला सूचना

नवी मुंबई : नवी मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांच्या आर्थिक प्रश्नासाठी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी ठोस पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध आरोग्यविषयक योजनांची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या महापालिकेतील ५२९ आशा सेविकांना साडेसात हजार रुपयांचा विशेष नागरी भत्ता लागू करण्याचे निर्देश गणेश नाईक यांनी दिले.

वाशी येथे शुक्रवारी झालेल्या जनता दरबारात श्रमिक सेनेच्या माध्यमातून आशा सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मंत्री गणेश नाईक यांना दिले. आशा सेविकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ना. नाईक यांनी तातडीने दखल घेत महापौर सुजाता पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि आगामी सर्वसाधारण सभेत विशेष नागरी भत्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.

२००७ पासून या आशा सेविका महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये काम करत आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक जनजागृतीपासून ते कुष्ठरोग आणि कर्करोग सर्वेक्षणापर्यंत विविध जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. मात्र, एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही त्यांना महापालिकेकडून कोणताही विशेष भत्ता मिळत नसल्याची बाब ना. नाईक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत ‘सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेच आशा सेविकांनाही न्याय मिळाला पाहिजे’, या भूमिकेतून नाईक यांनी महासभेत प्रस्ताव आणण्याच्या सूचना दिल्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सूचनेनुसार महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपयांचा विशेष नागरी भत्ता लागू करण्यात आला आहे.

आशा सेविकांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देत त्यांच्या आर्थिक हितासाठी पुढाकार घेतल्याने मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातील कार्यपद्धतीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. आता आगामी महासभेतील निर्णयाकडे ५२९ आशा सेविकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

कोकणच्या गणेशभक्तांसाठी नितेश राणेंची पोटतिडकी; पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना

Next Post

बांधकाम कामगारांच्या सुरक्षेला केंद्राचा ‘बूस्टर’!

Next Post
बांधकाम कामगारांच्या सुरक्षेला केंद्राचा ‘बूस्टर’!

बांधकाम कामगारांच्या सुरक्षेला केंद्राचा ‘बूस्टर’!

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा 1st चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ४,७७९ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा 1st चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ४,७७९ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर

“गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल; खुर्ची सोडा!”

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com