• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2026

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा 1st चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ४,७७९ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा 1st चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ४,७७९ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा 1st चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या ४ हजार ७७९ सदनिकांची संगणकीय सोडत शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे संपन्न झाली. यावेळी शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी; लक्ष्मीकांत गरजे, संचालक (आयटी), एनआयसी, नरेंद्र भामरे, संचालक (आयटी), एनआयसी; श्रीनिवास मोकळीकर, पणन व्यवस्थापक (गृहनिर्माण) तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिडकोतर्फे दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे ४ हजार २२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. योजनेतील काही सदनिका या दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव होत्या. या संगणकीय सोडतीमध्ये एकूण ३ हजार १४२ अर्जदार विजेते ठरले आहेत. सोडत पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडली असून यशस्वी अर्जदारांची यादी www.cidcohomes.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या गृहनिर्माण योजनेद्वारे विजेत्या अर्जदारांचे नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

कोट

“सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा 1st चॉइस’ या गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना नवी मुंबईसारख्या नियोजित व जागतिक दर्जाच्या शहरात परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर उपलब्ध करून देणे, हा सिडकोच्या गृहनिर्माण उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. या संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांचे गृहस्वप्न साकार होत असून, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशक गृहनिर्माणाच्या दिशेने सिडकोची वाटचाल सुरू आहे.”

श्री. अश्विन मुदगल, भा.प्र.से.

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Previous Post

बांधकाम कामगारांच्या सुरक्षेला केंद्राचा ‘बूस्टर’!

Next Post

“गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल; खुर्ची सोडा!”

Next Post
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर

“गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल; खुर्ची सोडा!”

भाजपच्या प्रितम म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे जावळे गाव खड्डेमुक्त!

भाजपच्या प्रितम म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे जावळे गाव खड्डेमुक्त!

ओबीसींच्या आकडेवारीशी खेळाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही!

ओबीसींच्या आकडेवारीशी खेळाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com