स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : दिल्लीसह देशभरातील तरुणाईने विविध प्रश्नांवर केलेल्या ‘जेन-झी आंदोलनातील’ प्रभावी आणि सर्जनशील पोस्टर्सचे विशेष प्रदर्शन २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरीवेल्ली प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे. पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान तयार केलेली उपरोधिक व प्रभावी पोस्टर्स या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थी, युवक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजक युवराज मोहिते यांनी केले आहे.



