• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, October 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 3, 2026

माधुरी हत्तीणीवरून पुन्हा वाद; पेटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

adminbyadmin
in देश - विदेश
0
माधुरीची घरवापसी; पण वंताराची माया कायम!

‘वनतारा’मध्ये पुन्हा पाठविण्याची मागणी; राजू शेट्टी म्हणाले, ‘पेटाची कारवाई सूडबुद्धीने’

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीच्या कोल्हापुरातील पुनरागमनानंतर आता तिच्यावरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. माधुरीला जामनगर येथील ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात पुन्हा पाठवावे, अशी मागणी पेटा इंडियाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. माधुरीच्या सध्याच्या ठिकाणी तिच्या आरोग्याची आणि कल्याणाची योग्य काळजी घेतली जात नसल्याचा दावा पेटाने केला आहे.

पेटाचा नेमका आरोप काय?

पेटाच्या म्हणण्यानुसार, माधुरी नांदणीला परतली तेव्हा तिचे फटाके, ढोल-ताशे, कर्णकर्कश आवाज आणि मोठ्या गर्दीत स्वागत करण्यात आले. तसेच सध्या माधुरीला साखळदंडात बांधून एकाकी ठेवण्यात येत असल्याचा आरोपही पेटाने केला आहे. माधुरीला यापूर्वी पायांच्या दुखापती आणि गुडघ्यांच्या समस्यांचा त्रास असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे कठीण पृष्ठभागावर दीर्घकाळ उभे राहणे किंवा चालणे तिच्यासाठी त्रासदायक असल्याचे पेटाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. माधुरीला पुन्हा वनतारामध्ये हलविण्याची मागणी करताना पेटाने २०२५ मधील मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचाही संदर्भ दिला आहे.

राजू शेट्टींचे पेटावर प्रत्युत्तर

माधुरीच्या घरवापसीसाठी दीर्घकाळ आंदोलन आणि न्यायालयीन लढा देणारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पेटाच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, माधुरीच्या स्वागतावेळी उत्साहाच्या भरात काही फटाके वाजले असतील; मात्र उच्चाधिकार समितीने घालून दिलेल्या नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. पेटा संस्था माधुरीच्या प्रकरणात सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

माधुरी ही पाळीव हत्तीण असून, वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर ती नांदणीत परतल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वागताच्या प्रसंगाकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मठाची भूमिका काय?

दरम्यान, नांदणी मठाच्या वतीने पेटाच्या आरोपांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत लेखी कळविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. पेटाकडून लेखी स्वरूपात माहिती मिळाल्यानंतर त्यावर सर्व संबंधितांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल, असे मठाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

माधुरीच्या आरोग्यावर वन विभागाचे लक्ष

या वादाच्या पार्श्वभूमीवर माधुरीच्या आरोग्याची देखरेख करण्याची जबाबदारीही महत्त्वाची ठरली आहे. महाराष्ट्र वन विभागाकडून दर पंधरवड्याला माधुरीच्या आरोग्याची पाहणी करण्यात येणार असून, सहाय्यक वनसंरक्षकांकडून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच तिला इतर मादी हत्तींसोबत सामाजिक संपर्क मिळावा यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

माधुरीच्या परतीला उच्चाधिकार समितीने काही अटींसह मंजुरी दिली होती. त्यामध्ये तिचा मिरवणूक, उत्सव किंवा श्रमाच्या कामासाठी वापर न करणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी यांसारख्या अटींचा समावेश आहे.

दरम्यान, पेटाच्या नव्या याचिकेमुळे माधुरीला पुन्हा वनतारात पाठवले जाणार का, याकडे आता कोल्हापूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

शिवरायांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही : नितेश राणे

Next Post

‘ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा’; गर्जना मोर्चासाठी नवी मुंबईत जनजागृती

Next Post
‘ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा’; गर्जना मोर्चासाठी नवी मुंबईत जनजागृती

‘ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा’; गर्जना मोर्चासाठी नवी मुंबईत जनजागृती

फ्लॅश मॉबच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानात संगीतमय स्वच्छता जनजागृती

फ्लॅश मॉबच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानात संगीतमय स्वच्छता जनजागृती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com