• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, October 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 3, 2026

फ्लॅश मॉबच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानात संगीतमय स्वच्छता जनजागृती

adminbyadmin
in नवी मुंबई
0
फ्लॅश मॉबच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानात संगीतमय स्वच्छता जनजागृती

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ हे महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबविले जात असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

आता नव्याने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू झाले असून त्यानुसार यापूर्वीच्या ओला आणि सुका अशा दोन प्रकारच्या कचरा वर्गीकरणामध्ये आता घरगुती घातक कचरा आणि स्वच्छताविषयक सॅनिटरी कचरा यांची भर पडलेली आहे. त्या अनुषंगाने आता ४ प्रकारे कचरा वर्गीकरण करावे याविषयी विविध माध्यमांतून लोकजागृती करण्यात येत आहे.

असाच एक अभिनव उपक्रम मॉल्समध्ये संध्याकाळी नागरिक कुटुंबियांसमवेत मोठ्या संख्येने खरेदीसाठी जातात हे लक्षात घेत सीवूडच्या नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये फ्लॅश मॉबसारख्या आधुनिक संगीतमय नृत्य प्रकाराव्दारे प्रभावीपणे सादर करण्यात आला.  

मॉलमध्ये नेहमीचे गर्दीचे वातावरण व नागरिकांमध्ये खरेदीची लगबग सुरू असताना अचानक श्रवणीय असे आकर्षित करून घेणारे संगीत वाजायला लागते. हा गाण्यांचा आवाज कुठून येतोय हे बघण्यासाठी लोक त्या दिशेने वळतात, तर त्यांना मॉलच्या मध्यभागी ८० हून अधिक युवक-युवतींचा समूह हा ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेचे स्वच्छताविषयक आवाहन करणारे फलक उंचावत नृत्य करताना दिसतो.

बघता बघता हे नृत्य पाहण्यासाठी त्यांच्या भोवताली गर्दी जमू लागते. मॉलमधले सर्वच नागरिक वेगवेगळ्या मजल्यांवरून ग्रीलच्या कठड्याजवळ येऊन खालच्या पॅसेजमधल्या नृत्याविष्काराला दाद देऊ लागतात. तरूणाईचे कॅमेरेही हा संगीतमय नृत्याविष्कार रिल्समध्ये टिपण्यासाठी कॅमेरा धरून चित्रीकरण करू लागतात.

आरंभ क्रिएशन्सचा ८० कलावंतांचा नृत्यसमुह लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून तसेच खास ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानासाठी तयार केलेल्या गीतांच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण व स्वच्छतेविषयी आवाहन करू लागतो. त्याला नागरिकांचा उत्साही प्रतिसादही लाभतो.

यामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे ओलू, सुकू, घातकू हे ३ प्रकारच्या कचऱ्याचे शुभंकर (मॅस्कॉट) लक्षवेधी ठरतात. या मॅस्कॉटसोबत अनेकजण हौसेने सेल्फी छायाचित्रे काढतात. विशेषत्वाने मुलांची मॅस्कॉटशी हात मिळविण्यासाठी झुंबड उडते. त्यांच्या पालकांचे मोबाईल कॅमेरे मॅस्कॉटसोबत मुलांचा फोटो काढण्यासाठी लखलखू लागतात.

अशा तऱ्हेने संगीतमय गीतनृत्याच्या सादरीकरणातून स्वच्छतेचा संदेश आणि प्राधान्याने कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी म्हणजे घरापासूनच कचऱ्याचे ४ प्रकारे वर्गीकरण करावे हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवला जातो.  

Previous Post

‘ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा’; गर्जना मोर्चासाठी नवी मुंबईत जनजागृती

Next Post

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडवर ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा; उकाड्याने नागरिक हैराण

Next Post
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडवर ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा; उकाड्याने नागरिक हैराण

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडवर ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा; उकाड्याने नागरिक हैराण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com