• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, October 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 3, 2026

पंतप्रधान मोदी ३ नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
विना भूसंपादन शेतातील अतिक्रमणावर पंतप्रधानाकडे सोशल मीडियावर दाद मागताना जुन्नरचा मराठा समाजाचा शेतकरी

 ‘प्रेरणास्थळ’चे करणार उद्घाटन

वसंत गोपाळे :  Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात उभारण्यात येत असलेल्या ‘प्रेरणास्थळ’ मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात विद्यार्थ्यांना ध्यान, आत्मचिंतन आणि मानसिक विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रेरणास्थळ’ केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. या केंद्रात भव्य डोमची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा साकारण्यात आला आहे.

या केंद्रामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महान व्यक्तिमत्त्वांची भव्य छायाचित्रेही लावण्यात येणार आहेत. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, त्यांच्या विचारांचा अभ्यास करावा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, या उद्देशाने या केंद्राची संकल्पना करण्यात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

‘प्रेरणास्थळ’मध्ये विद्यार्थ्यांसाठी योग आणि प्राणायामाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाणार आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न या केंद्रातून केला जाणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यामुळे ‘प्रेरणास्थळ’च्या उद्घाटन कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीला लवकरच वेग येण्याची शक्यता आहे.

Previous Post

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडवर ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा; उकाड्याने नागरिक हैराण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com