• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, October 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 16, 2026

स्पिडीच्या कामगारांची दिवाळीआधीच दिवाळी!

adminbyadmin
in रायगड
0
स्पिडीच्या कामगारांची दिवाळीआधीच दिवाळी!

महेंद्रशेठ घरत यांच्या दमदार नेतृत्वाखाली नऊ हजार रुपयांची भरघोस पगारवाढ!
शितल पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
उरण  : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या करिष्माने स्पिडी मल्टिमोड्स प्रा. लिमिटेडच्या कामगारांना चक्क नऊ हजारांची भरघोस पगारवाढ करण्याचा ऐतिहासिक करार मंगळवारी (ता. १३) करण्यात आला. तसेच मेडिकल, बोनस, फेस्टिवल अॅडव्हान्स, गणवेश आणि इतरही सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे कामगारांना दिवाळीआधीच दिवाळीचा आनंद झाला आहे. हा करार पाच वर्षांसाठी आहे. याचा फायदा सुमारे ४०० कामगारांना होणार आहे. यावेळी न्यू मॅरिटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेचे (एनएमजीकेएस) संस्थापक–अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस वैभव पाटील, तसेच कामगार प्रतिनिधी तुकाराम कडू, तसेच व्यवस्थापनाच्या वतीने प्रवीण पाटील, प्रणीत पाटील उपस्थित होते.
स्पिडी मल्टिमोड्स प्रा. लिमिटेडमध्ये सुमारे आठ युनियन होत्या, मात्र तरीही कामगारांना न्याय मिळत नव्हता. कामगार अक्षरशः वाऱ्यावर होते. त्यामुळे सहा युनियनच्या कामगारांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्वीकारले. साहजिकच स्थानिक भूमिपुत्र कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी स्पिडीच्या व्यवस्थापनाशी अनेक बैठका घेऊन सकारात्मक चर्चा सुरू ठेवली. त्याला यश आले आहे.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “स्थानिक कामगारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही. हे व्यवस्थापनाला समजावून सांगितले. व्यवस्थापनाचीही बाजू ऐकून घेतली. त्यामुळे स्पिडीच्या व्यवस्थापनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे कामगारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरविला. कामगारांची आता आणखी जबाबदारी वाढली आहे. कंपनीत प्रामाणिकपणे काम करून कंपनी अधिकाधिक फायद्यात कशी येईल, याचा विचार कामगारांनी करणे गरजेचे आहे. कंपनी आणि कामगार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कंपनी व्यवस्थित चालली तर कामगारांचीही रोजीरोटी कायम सुरू राहील. त्यामुळे कामगारांनी व्यवस्थापनाला आता अधिकाधिक सहकार्य करावे. स्पिडी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांना चांगली पगारवाढ केल्याबद्दल व्यवस्थापनाचा आभारी आहे.”
यावेळी कामगारांचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून तुकाराम कडू बोलताना म्हणाले, “गेली अनेक वर्षे कामगारांना कुणी वालीच नव्हता. त्यामुळे आम्ही महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्वीकारले. आजचा पगारवाढीचा करार केवळ महेंद्रशेठ घरत यांच्या डॅशिंग आणि अभ्यासपूर्ण नेतृत्वामुळेच झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्व कामगार त्यांचे ऋणी आहोत.”
यावेळी व्यवस्थापनातर्फे प्रणीत पाटील आणि प्रवीण पाटील म्हणाले, “कामगार, व्यवस्थापन आणि युनियन यांच्यात सामंजस्य कसे राखावे. चर्चा करताना खेळीमेळीचे वातावरण ठेवून व्यवस्थापनाची बाजूही ऐकून घेण्याची कला महेंद्रशेठ घरत यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून आम्हीही खूप काही शिकलो. महेंद्रशेठ घरत यांच्या सकारात्मक विचारसरणीचा आणि वजनदार नेतृत्वाचा परिपाक म्हणजेच आजचा पगारवाढीचा करार आहे. त्याबद्दल आम्हीही महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानतो.”
यावेळी विवेक म्हात्रे, अनंत कडू, जयेंद्र कडू, प्रवीण कडू, धर्मेंद्र कडू, दिनेश तांडेल, गजानन म्हात्रे, दिपक पाटील, अजय ठाकूर, चक्रधर घरत, गणेश घरत, दिलीप तांडेल, पंकज घरत, मनोज तांडेल, निशिकांत घरत आदी कामगारही उपस्थित होते.

Previous Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणेंची पडवेतील थोरल्या बंधाऱ्याची पाहणी !

Next Post

भविष्यात ३ हजार वाहनांची पार्किंग उपलब्ध होणार, मग भूमिगत वाहनतळासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

Next Post
भविष्यात ३ हजार वाहनांची पार्किंग उपलब्ध होणार, मग भूमिगत वाहनतळासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

भविष्यात ३ हजार वाहनांची पार्किंग उपलब्ध होणार, मग भूमिगत वाहनतळासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com