• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, October 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2026

शौचालय तयार, तरीही कुलूपबंद! युवा सेनेचा ३१ ऑक्टोबरचा अल्टिमेटम; १ नोव्हेंबरला स्वतः खुली करणार!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भविष्यात ३ हजार वाहनांची पार्किंग उपलब्ध होणार, मग भूमिगत वाहनतळासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

नेरूळ सेक्टर ८ मधील दोन सार्वजनिक शौचालये सुरू करण्यासाठी निखिल मांडवे आक्रमक; आयुक्तांना निवेदन देत संयुक्त पाहणीची मागणी

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : बांधकाम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले, संपूर्ण पावसाळाही संपला; मात्र नेरूळ सेक्टर ८ मधील दोन सार्वजनिक शौचालये अद्याप नागरिकांसाठी खुली झालेली नाहीत. महापालिकेच्या निधीतून उभारलेल्या सुविधा तयार असूनही कुलूपबंद असल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही शौचालये नागरिकांसाठी खुली करा; अन्यथा १ नोव्हेंबरला आम्हीच ती जनतेसाठी खुली करू, असा इशारा त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

नेरूळ सेक्टर ८ मध्ये दोन सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी महापालिका प्रशासनाने साधारणतः एप्रिल २०२६ मध्ये कार्यादेश दिले होते. या दोन्ही शौचालयांची कामे पूर्ण झाली असून, ती वापरासाठी सज्ज असल्याचे मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे. माजी नगरसेविका सुनीता रतन मांडवे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या शौचालयांच्या कामांना चालना मिळाली. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ती नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नागरिकांची गैरसोय, प्रशासन मात्र गप्प?

सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधा नागरिकांच्या उपयोगासाठी असतात. असे असताना तयार झालेली शौचालये अनेक महिने बंद का ठेवण्यात आली आहेत, असा सवाल निखिल मांडवे यांनी उपस्थित केला आहे. शौचालयांच्या अभावामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असताना नव्याने बांधलेल्या सुविधांचा वापरच होत नसेल, तर या कामांचा उपयोग काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी यापूर्वी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, पाहणीसाठी वेळ मिळाला नसल्याने आता थेट महापालिका आयुक्तांकडे धाव घ्यावी लागल्याचे मांडवे यांनी स्पष्ट केले.

कनिष्ठ अभियंत्यांसोबत संयुक्त पाहणीची मागणी

निखिल मांडवे यांनी आयुक्तांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी तातडीने प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून संयुक्त पाहणी करावी, शौचालयांचे काम पूर्ण होऊनही ती बंद का ठेवण्यात आली आहेत याचे लेखी व समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे आणि कोणतीही अनावश्यक कारणे पुढे न करता दोन्ही शौचालये त्वरित नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत; अन्यथा १ नोव्हेंबरला कृती!

“नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने आणखी टाळाटाळ करू नये. तयार असलेली शौचालये ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू करावीत. अन्यथा १ नोव्हेंबरला ती स्थानिक जनतेसाठी खुली करण्याचे पाऊल उचलले जाईल,” असा स्पष्ट इशारा निखिल मांडवे यांनी दिला आहे.

आता महापालिका प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन दोन्ही शौचालये निर्धारित मुदतीत सुरू करणार का, की नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार, याकडे नेरूळ सेक्टर ८ मधील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन

Next Post

दुष्काळाच्या झळा मच्छीमारांनाही; मदतीसाठी नितेश राणे मैदानात!

Next Post
दुष्काळाच्या झळा मच्छीमारांनाही; मदतीसाठी नितेश राणे मैदानात!

दुष्काळाच्या झळा मच्छीमारांनाही; मदतीसाठी नितेश राणे मैदानात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com