• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, October 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2026

दुष्काळाच्या झळा मच्छीमारांनाही; मदतीसाठी नितेश राणे मैदानात!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दुष्काळाच्या झळा मच्छीमारांनाही; मदतीसाठी नितेश राणे मैदानात!

शितल पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

बीडच्या गोविंदवाडी तलावाची पाहणी

मत्स्यबीज नष्ट झाल्याने नुकसान

तातडीने मदत आणि गाळ काढण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : कमी पाऊस, खालावलेली जलपातळी आणि नष्ट झालेले मत्स्यबीज यामुळे राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका आता मच्छीमारांनाही बसू लागला आहे. तलावांमधील पाणीसाठा घटल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होत असून, मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी तलावाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नुकसानग्रस्त मच्छीमारांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याची ग्वाही देतानाच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

राज्यातील कमी पर्जन्यमानामुळे अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता तलावांवर अवलंबून असलेल्या मत्स्यव्यवसायावरही होत आहे. गोविंदवाडी तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, मत्स्यबीज नष्ट झाल्यामुळे मत्स्य उत्पादन घटल्याचे पाहणीदरम्यान समोर आले.

गतवर्षी तलावातील मत्स्य उत्पादन ५४.६ टक्के असल्याची माहिती देण्यात आली. यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत मत्स्यव्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला. मच्छीमारांच्या नुकसानीची अचूक आकडेवारी संकलित करून त्यांना आवश्यक मदत देण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गोविंदवाडी तलावातील गाळ सिंचन व पाटबंधारे विभागामार्फत तातडीने काढण्यात यावा आणि त्यासाठी आवश्यक प्रस्ताव लवकर सादर करावा, अशी सूचना मंत्री राणे यांनी केली. मच्छीमारांना दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून देणे, तसेच मत्स्यबीज नष्ट झाल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे, यावरही त्यांनी भर दिला.

नुकसानग्रस्त मच्छीमारांना मदत मिळण्यासाठी प्रथम नुकसानीचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक आहे. त्यानंतर शासनाच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही मदतीचा आधार

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांप्रमाणेच संकटग्रस्त मच्छीमारांनाही आर्थिक आधार मिळणे आवश्यक असल्याची भूमिका मंत्री राणे यांनी मांडली. मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राशी संबंधित दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड (KCC), वीजदर सवलती आणि अन्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

केसीसी धारक मच्छीमारांना बँकांकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी असल्यास त्यांची तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय मच्छीमार संस्थांचे प्रलंबित अर्ज, बँकांकडून अर्थसहाय्य मिळण्यातील अडचणी आणि अपघाती मृत्यू झालेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यावर त्यांनी भर दिला.

दुष्काळग्रस्तांसाठी शासनाच्या मदतीकडे लक्ष

गोविंदवाडी तलावाच्या पाहणीवेळी आमदार विजयसिंह पंडित, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, प्रादेशिक उपायुक्त सुरेश भारती, भाजप नेते तथा माजी मंत्री बदामराव पंडित, भाजप नेते बाळराजे पवार आणि स्थानिक मच्छीमार उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती, पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध क्षेत्रांतील घटक अडचणीत येत असताना, नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे आव्हान शासनासमोर आहे. गोविंदवाडी तलावाच्या पाहणीतून मच्छीमारांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी तातडीच्या उपाययोजनांसाठी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

Previous Post

शौचालय तयार, तरीही कुलूपबंद! युवा सेनेचा ३१ ऑक्टोबरचा अल्टिमेटम; १ नोव्हेंबरला स्वतः खुली करणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com