• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, October 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 24, 2026

हायकल कंपनीतील कामगारांसाठी तब्बल २० हजार रुपयांची भरघोस पगारवाढ 

adminbyadmin
in रायगड
0
हायकल कंपनीतील कामगारांसाठी तब्बल २० हजार रुपयांची भरघोस पगारवाढ 

 कामगारांनी मानले महेंद्रशेठ घरत यांचे आभार
शितल पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : हायकल प्रा. लिमिटेड तळोजा या कंपनीत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाने कामगारांसाठी दिवाळीआधीच धमाका केला आहे. चक्क २० हजार रुपयांची दणदणीत पगारवाढ देण्याचा अभूतपूर्व करार शुक्रवारी करण्यात आला. न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेचे (एनएमजीकेएस) संस्थापक-अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात हा या वर्षातील बारावा करार आहे.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “यापूर्वी अनेक संघटना ‘हायकल’ मध्ये होत्या, परंतु आमच्या संघटनेने हायकलमध्ये कामगारांना सतत भरघोस पगारवाढीचे करार केले. मी नेहमीच कामगारांना सांगतो, कंपनी जगली, तिची भरभराट झाली तर तुमचेही भले होईल. त्यामुळे कामगारही इमानेइतबारे काम करीत आहेत.  कामचुकार कामगारांना पाठीशी घातले जाणार नाही, मात्र त्याचवेळी विनाकारण कुठल्याही कामगारावरील अन्यायही सहन केला जाणार नाही. हायकलच्या व्यवस्थापनाने आजपर्यंत उत्तम सहकार्य केले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाचे मी आभार मानतो.”
व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर (एचआर) विशाल पाटील म्हणाले, “आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी नेहमीच सकारात्मक आणि सौहार्दाची भूमिका घेतली. कधीही कंपनीत बंद, आंदोलन हा प्रकार त्यांनी केला नाही. नेहमीच त्यांनी कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीनेही मोलाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत करार करताना आनंद होत आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.”
‘हायकल’च्या कामगारांना यावर्षी ४४ हजार रुपये बोनस, तर पाचव्या वर्षी ५४ हजार रुपये बोनस मिळणार आहे. अडीच लाखांचा मेडिक्लेम, विशेष म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतरही ६५ व्या वर्षांपर्यंत मेडिक्लेमचा लाभ कामगारांना मिळणार आहे. त्यामुळे असा लाभ कामगारांना देणारी हायकल प्रा. लि. ही तळोजा एमआयडीसीत पहिलीच असल्याचा अभिमान कामगारांना आहे. तसेच फेस्टिव्हल अॅडव्हान्स आणि इतरही सुविधा कामगारांना मिळणार आहेत. त्यामुळे कामगार अत्यानंदात असून त्यांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले आहेत.
यावेळी एनएमजीकेएसचे सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर (एचआर) विशाल पाटील, एचआर मॅनेजर देवेंद्र पालेकर, तर कामगार प्रतिनिधी पी. एस. म्हात्रे, निलेश कदम, जयंत म्हात्रे, हनुमंत पवार आदी उपस्थित होते.

Previous Post

दुष्काळाच्या झळा मच्छीमारांनाही; मदतीसाठी नितेश राणे मैदानात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com