• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, October 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 24, 2026

दुष्काळावर मात करण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबवा!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दुष्काळावर मात करण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबवा!

शेतकरी-मच्छिमारांना योजनांचा लाभ द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अहिल्यानगर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि मच्छिमारांना दिलासा देण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबवून सूक्ष्म नियोजन करावे. गाळ काढल्याने तलावांची पाणी साठवण क्षमता वाढेल, शेतीची सुपीकता सुधारेल आणि मत्स्यव्यवसायालाही चालना मिळेल, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी आणि मच्छिमार बांधवांना मदतीची गरज आहे. त्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तलावांतील गाळ काढण्याच्या मोहिमेचा सविस्तर आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे राणे यांनी सांगितले.

तलावांतून काढलेला गाळ शेतीसाठी वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर तलावांची पाणी साठवण क्षमता वाढल्याने भविष्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठीही हातभार लागेल. पाणीसाठे सक्षम झाल्यास मत्स्यव्यवसायासाठी पोषक परिस्थिती निर्माण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आणि मच्छिमारांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यावर मंत्री राणे यांनी भर दिला. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित बैठका घेऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा. दुष्काळी परिस्थितीत पाणीसाठ्यांचे व्यवस्थापन, तलावांतील गाळ काढणे आणि शेतकरी-मच्छिमारांना शासकीय मदत मिळवून देणे यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असेही राणे यांनी सांगितले.

दुष्काळाच्या संकटात जलसाठे पुनरुज्जीवित करणे, शेतीची उत्पादकता वाढवणे आणि मत्स्यव्यवसायाला आधार देणे या उपाययोजनांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

Previous Post

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील दुष्काळासह विविध विकास कामांचा आढावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com