• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 10, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 10, 2026

रॉकेटबाजीला ब्रेक! नवी मुंबईत दोन महिने बंदी; उल्लंघन केल्यास थेट गुन्हा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रॉकेटबाजीला ब्रेक! नवी मुंबईत दोन महिने बंदी; उल्लंघन केल्यास थेट गुन्हा

७४ आगींच्या घटनांनंतर महापालिकेचा कठोर निर्णय; ८ जानेवारी २०२७ पर्यंत प्रतिबंध

जीवन गव्हाणे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : दिवाळीत फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या ७४ गंभीर घटनांची दखल घेत नवी मुंबई महापालिकेने हवेत उडणाऱ्या रॉकेट आणि तत्सम फटाक्यांच्या वापरावर कठोर बंदी घातली आहे. नागरिकांच्या जीवितासह सार्वजनिक व खासगी मालमत्तेची सुरक्षितता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याने रॉकेटबाजी करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ८ जानेवारी २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. सार्वजनिक व खासगी जागा, निवासी इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारे तसेच निवासी परिसरातही रॉकेट आणि तत्सम उडत्या फटाक्यांना मनाई करण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात शहरात विविध ७४ ठिकाणी आगीच्या गंभीर घटना घडल्या. यामध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. काही नागरिकांकडून इमारतींच्या गच्च्यांवरून, बाल्कनीतून तसेच हातात धरून रॉकेट उडविण्याचे धोकादायक प्रकार समोर आले. अशा बेफिकीर कृत्यांमुळे आग लागण्याचा आणि जीवितहानी होण्याचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ व ६० अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, अन्य फटाके फोडण्यासाठी न्यायालयीन निर्देशांनुसार संध्याकाळी ७ ते रात्री १० हीच वेळ राहणार असून, त्यासाठी प्रचलित कायदे व सक्षम प्राधिकरणांचे आदेश पाळणे बंधनकारक असेल.

आदेशाच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वी नियुक्त केलेली विशेष भरारी पथके लक्ष ठेवणार असून, संबंधित पोलीस अधिकारी, विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि अग्निशमन विभागावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांनीही आपल्या सभासदांना या बंदीची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सुरक्षिततेशी तडजोड नाही, रॉकेटबाजीला थारा नाही, असा स्पष्ट संदेश देत महापालिका आयुक्तांनी नागरिकांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

दिवाळीच्या रात्री नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर! पहाटे ५ वाजेपर्यंत २५ टन कचऱ्याची उचल

Next Post

मच्छीमारांच्या सुख-दुःखात नितेश राणेंची दिवाळी; कोळी कुटुंबीयांसोबत साजरा केला आनंदोत्सव!

Next Post
मच्छीमारांच्या सुख-दुःखात नितेश राणेंची दिवाळी; कोळी कुटुंबीयांसोबत साजरा केला आनंदोत्सव!

मच्छीमारांच्या सुख-दुःखात नितेश राणेंची दिवाळी; कोळी कुटुंबीयांसोबत साजरा केला आनंदोत्सव!

पृथ्वीचा पारा चढला! २०२६ उष्णतेचा विक्रम मोडणार?

पृथ्वीचा पारा चढला! २०२६ उष्णतेचा विक्रम मोडणार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com