• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2026

शिक्षण प्रसारक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिक्षण प्रसारक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

संविधानाच्या मूल्यांचे आचरण करण्याचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांचे आवाहन

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नेरूळ : एनआरबी एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल ट्रस्ट संचालित शिक्षण प्रसारक विद्यालय, नेरूळ येथे २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानातील मूलभूत मूल्यांचा जागर करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधान हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असून, संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा व स्वातंत्र्याचा अधिकार तसेच न्यायाची हमी दिली आहे. संविधानाचा केवळ आदर करणे पुरेसे नसून त्यातील मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी संविधानाचे सजग अभ्यासक बनून आदर्श नागरिक होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक शेखर शांताराम जगताप यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रथमेश गणेश शिंदे, सुदर्शन दहिफोडे आणि आशिष वाघ यांनी संविधान दिनावर आधारित कविता सादर केल्या. तर वैभवी सावळे, सोहम साळुंखे, रिया पाटेकर आणि श्रावणी आचरे यांनी संविधानाविषयी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली परदेशी यांनी केले, तर भाऊसाहेब आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी समाजसेवक कैलास म्हात्रे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील यांच्यासह शिक्षकवृंद रंजना साळुंके, सनकादिक म्हात्रे, अश्विनी पांढरे, सुगंधा घुले, सुनंदा नौकुडकर, काळूराम जाधव, निराशा मोकल, कमल पुकळे, खुशी खोत तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

दिव्यांग प्रमाणपत्रांचा संशयास्पद वापर! पुणे जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

Next Post

संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन

Next Post
संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन

संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन

बेलापूर न्यायालय, नवी मुंबई महापालिकेला बॉम्बची धमकी!

बेलापूर न्यायालय, नवी मुंबई महापालिकेला बॉम्बची धमकी!

जनता दरबार ते जनसंवाद… आता सागर नाईकही मैदानात!

जनता दरबार ते जनसंवाद... आता सागर नाईकही मैदानात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com