नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात ऐरोली व बेलापूर असे दोन विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्हीही मतदान संघातील नागरिकांनी आपला अमूल्य वेळ खर्ची करुन अर्जासोबत ङ्गोटो देवून सुद्धा त्यांना आजपर्यंत कोकण भवन येथील निवडणूक कार्यालयामार्ङ्गत निवडणूक ओळखपत्रांचे वाटप न झाल्याने त्या संबधात चौकशी करण्यास समाजसेवक मनोहर तोतलानी गेले असता अधिकारी व कर्मचारी नागरिकांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याची धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली.
या कार्यालयात मतदान ओळखपत्रांचे ढिग कचर्यासारखे पडून आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यातरी अजून नागरिकांना ओळखपत्रे मिळाली नसल्याने संबंधीत कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी मनोहर तोतलानी यांनी केली आहे.