बुधवार, दि. १२ मार्च, सांयकाळ, वेळ : ८वाजून ४० मिनिट
अमोल क्षीरसागर
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मधील भाजी मार्केटचे मैदान गेल्या काही दिवसापासून चर्चेच्या प्रकाशझोतात आले. परिक्षा कालावधी पाहता या मैदानावर मार्च महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमास परवानगी न देण्याची कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर सातत्याने प्रयास करत असतानाही या मैदानावर सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन होतच आहे. शिवसेना शाखा क्रं. ६९च्या वतीने बुधवार, दि. १९ मार्च रोजी या मैदानावर शिवजंयती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्च महिन्यात दहावी-बारावीच्याच नाही तर पाचवी ते नववीच्या परिक्षा होत असून रहीवाशी नागरी वस्तीमधील छोटेखानी मैदानावर कोणत्याही पक्षाच्या अथवा सामाजिक संघटनांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देवू नये यासाठी महापालिका प्रशासन व पोलीसांकडे मनोज मेहेर सातत्याने लेखी पत्रव्यवहार करून चपला झिजवित आहेत. नुकताच त्यांनी पालकमंत्र्यांच्याही ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ या कार्यक्रमातही मुलांच्या अभ्यासात व्यक्त्य येवू नये यासाठी विरोध करत जनता दरबारातही त्यांनी ना. गणेश नाईकंाची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतरही एका सामाजिक संस्थेचे त्या ठिकाणी जागतिक महिला दिनी सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नेरूळ, सेक्टर सहामधील शाखा क्रमांक ६९च्या वतीने दि. १९ मार्च रोजी या मैदानावर शिवजंयती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत मोफत नेत्र चिकीत्सा शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. सांयकाळी ५.३० ते रात्रौ १० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या शिवजंयती उत्सवामध्ये शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, जिल्हा महिला संघठक सौ. रंजनाताई शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, के.एन.म्हात्रे, शहरप्रमुख विजय माने, शहरसंघठक सौ. रोहीणीताई भोईर, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे, नगरसेवक सतीश रामाणे, विभागप्रमुख गणेश घाग, बबन जोशी, बबन पाटील आदी मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांनी दिली.
प्रकाश गायकवाड, जयद्रथ परब, गणेश मोटे, इमरान नाईक, संभाजी राऊत, नाना आंबवले, विजय सांळुखे, किसन सोनवणे, संजय सिद्रुक,एकनाथ नाईक, शिवाजी दाभोळे हे या शिवजयंती उत्सवाचे प्रमुख निमत्रंक असून नितेश परब, परेश जाधव हे या उत्सवाचे प्रमुख कार्यवाहक आहेत.