मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला गेल्या काही वर्षापासून नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमधील शिवम सोसायटीमध्ये रामनवमीच्या दिनी साई भंडार्याचे आयोजन करण्यात आले असून नवसाला पावणारा साईबाबा अशी येथील मंदीरातील साईबाबांची ख्याती आहे.
गेल्या १२ वर्षापासून शिवम सोसायटीतील शिवसाई उत्सव मंडळाकडून या साईभंडार्याचे आयोजन करण्यात येत असून यंदाही ६ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत साई भंडार्याचे आयोजन करण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते रात्रौ ९ या कालावधीत श्री. साई चरित्र पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७ एप्रिलला सकाळी ९ ते रात्रौ ९ या कालावधीत श्री साई चरित्र पठनाचा कार्यक्रम साई मंदीरात होणार आहे. सांयकाळी ५ वाजता परिसरात साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमीच्या दिनी ८ एप्रिलला पहाटे ५ वाजता साईंची काकड आरती, सकाळी ६ वाजता साईंची पूजा,सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापुजा, दुपारी १२ नंतर महाप्रसादास प्रारंभ आणि सांयकाळी ८ वाजता सुस्वर भजन, रात्रौ १० वाजता धुप आरती या भंडार्याची सांगता होणार आहे.
या साईभंडारा यशस्वी करण्यासाठी शिवम सोसायटीतील सोपान सावंत, सतीश लाड, नवनाथ उरसळ, गणपत सावर्डेकर, मारूती बोरकर, उमेश दरवेस, तेजस मुनवर, सुंदर पगारे, संदीप बोरकर, अनुप मार्कंडे, धनजंय (राजू) आहेर, अकूंर मुनवर यांच्यासह शिवम सोसायटीचे पदाधिकारी, रहीवाशी, शिवसाई उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि शिवम सोसायटीतील रहीवाशी परिश्रम करत आहेत.
या साई भंडार्यास नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने भक्तिभावाने व श्रध्देने सहभागी होवून भंडार्याची शोभा वाढवावी आणि साई पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसाई उत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.