मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाकरीता शिवसेनेनेे आमदार राजन विचारेंसारखा स्वच्छ प्रतिमेचा मातब्बर उमेदवार दिल्याने शिवसैनिकांमध्ये व शिवसेना पदाधिकार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून मंगळवार, दि. १५ एप्रिल रोजी नेरूळ पूर्वेला सांयकाळनंतर शिवसेनेच्या चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उपनेते व नवी मुंबईचे माजी महापालिका आयुक्त विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली या चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यत नेरूळ पूर्वेला शिवसेनेच्या चौकसभांचा धुराळा उडणार असून नेरूळ सेक्टर ३ मधील हॉटेल रंगोलीजवळून या चौकसभांना सुरूवात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ शिवसैनिक सुकुमार किल्लेदार यांनी दिली आहे.
हॉटेल रंगोलीनंतर, सेक्टर १५ मधील शिवसेना शाखा, सेक्टर ११-१५चे भाजी मार्केट, सेक्टर २१ चे डी-मार्ट, भिमाशंकर सोसायटी, सेच्युरियन मॉल आणि त्यानंतर दारावे गावातील गांवदेवी मंदीराजवळ चौकसभांची सांगता होणार आहे.
शिवसेना उपनेते विजय नाहटा, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, सुकुमार किल्लेदार यांच्या आक्रमक भाषणांनी जनजागृती होणार असल्याने नेरूळ पूर्वेतील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.