मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : ठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन विचारे हे मंगळवार, दि. १५ एप्रिल रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केटमधील घटकांची भेट घेण्यासाठी सकाळी येणार आहे.
बाजार समिती आवारातील भेट अभियान सकाळी ७ वाजता सुरू होवून ते सकाळी १०.३० वाजेपर्यत चालणार आहे. सकाळी ७ वाजता भाजी मार्केटमधील घटकांना आमदार राजन विचारे भेटण्यास सुरूवात करणार असून ७ ते ८.३० भाजी मार्केट, फळ मार्केटमध्ये ८.३० ते १०, कांदा-बटाटा मार्केटमध्ये १० ते १०.३० या वेळेत आमदार राजन विचारे हे व्यापारी, खरेदीदार, माथाडी, मापाडी, वारणार व बाजार आवारातील अन्य घटकांची भेट घेणार आहेत. या पाहणी अभियानात शिवसैनिकांनी व युवासैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी केले आहे.