मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, एनसीपी, पीआरपी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना ठाणे येथील श्री नरसिंह फाऊंडेशनने जाहिर पाठिंबा दिला आहे. लोकाभिमुख कामे करणार्या खा. संजीव नाईक यांना ठाणे लोकसभा मतदार संघातील बिहारी समाज बांधवांनी पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन फाऊंडेशनच्यावतीने नागरिकांना केले आहे.
श्री नरसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात झा यांनी पत्रकातून जाहिर पाठिंबा दिला. त्यांनी पत्रकात म्हणाले आहे की, आमच्या संस्थेचा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ.संजीव गणेश नाईक यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. त्यांनी ठाण्यामध्ये लोकोपयोगी कामे केली आहेत. तसेच बिहारी समाजाच्या दृष्टीनेही नाईक यांनी चांगले उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी आपले अमुल्य मत नाईक यांनांच द्यावे, असे आवाहन झा यांनी केले आहे. श्री नरसिंग फाऊंडेशन बिहार आणि झारखंड येथील नागरिकांचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा, यादृष्टीने काम करते आणि यासाठी नेहमीच नाईक यांचा मदतीचा हात सर्वांनाच मिळत असतो. त्यामुळे नाईक यांना आपला जवळचा भाऊ समजुन त्यांना मत द्यावे, असे आवाहन श्री नरसिंग फाऊंडेशनने केले आहे. नाईक यांना निवेदन देताना प्रभात झा, परेश झा, प्रविण झा, ज्योती, रेसम झा, किशोर बेलोसे, सुनिल पवार, समीर आपिष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.