सुजित शिंदे – ९८६९२३६४४४
नवी मुंबई :- राज्यात ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शिवसेना आणि एनसीपीसाठी प्रतिष्ठेची ठरलेली असतानाच ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या तिसर्या सभागृहात केलेली कामे व आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानभवनाचे गाजविलेले दालन या कामांची एनसीपीकडून प्रचारअभियानात का प्रसिध्दी होत नाही, याचे कोडे आजही नवी मुंबईकरांना उलगडलेले नाही.
नवी मुंबईत सिडको सदनिकाधारकांची, डोंगराळ विभागातील व झोपडपट्टीधारकांची संख्या लक्षणीय आहे. या वर्गासाठी संदीप नाईकांनी महापालिकेच्या तिसर्या सभागृहात भरीव कामगिरी आजही पालिका कार्यक्षेत्रातील प्रभागाप्रभागामध्ये ठळकपणे पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या पहिल्या दोन सभागृहामध्ये नवी मुंबईतील रथी-महारथी वावरत असतानाही जे त्यांना जमले नाही, ते तळागाळातील बहूजन वर्गातील समाजकारणात मुरलेल्या व तत्कालीन परिस्थितीत राजकारणात नवख्या असलेल्या संदीप नाईकांनी करून दाखविले. पावसाळीपूर्व कामे कशाशी खातात हे पालिका सभागृहात दहा वावरणार्यांनाही जमले नाही, कारण त्यांनी कधी ते समजून घेतलेच नाही. ते संदीप नाईकांनी करून दाखविले.
स्थायी समितीमधील सदस्य म्हणून सुरूवातीची दोन वर्षे काम केल्यावर सभापतीपदी विराजमान झाल्यावर पावसाळीपूर्व कामे काय असतात, हे सर्वप्रथम नवी मुंबईकरांना संदीप नाईकांनीच दाखवून दिले. हे पूर्वीच्या दोन सभागृहात कोणालाही जमले नव्हते. पावसाळी पूर्व कामांचा आढावा संदीप नाईकांनी सातव्या मजल्यावरील वातानुकुलीत कार्यालयात बसून घेतला नाही. पालिकेनेे सादर केलेल्या कागदोपत्री माहितीवर या माणसाचे समाधान झालेच नाही. संदीप नाईकांनी पायपीट करत, गटारे-नाले तुडवित, डोंगराळ परिसर, स्लम विभाग पिंजून काढत परिस्थिती जाणून घेतली. पाणी कोठेही चोकअप होणार नाही याची स्वत: पाहणी केली. नवी मुंबईच्या समस्या जाणून घेण्यासाठी नवी मुंबईत पायपीट करणारे संदीप नाईक हे खर्या अर्थांने एकमेेव नेतृत्व आहे. आज विकासाच्या सकारात्मक प्रचाराला घराणेशाहीचा आरोप करत तेच तेच तुणतुणे वाजविणार्यांना राजाच्या पोटी राजाच जन्माला येतो, शेंदाड शिपाई नाही हे संदीप नाईकांनी उक्तीने नाही तर आपल्या कृतीने करून दाखविले.
आज पालिकेच्या चौथ्या सभागृहात वावरणारे सर्वपक्षीय नगरसेवक सिडको सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून जनसामान्यात शेखी मिरवितात. पण सिडको वसाहतीमधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पालिका मोफत कामे कधीपासून व कोणाच्या परिश्रमामुळे करू लागली याची माहिती नवी मुंबईकरांना विशेषत: सिडकोच्या सदनिकाधारकांना करून देणे गरजेचे असताना एनसीपी त्यात कमी का पडत आहे, त्याचे गुढ आजतागायत उकललेले नाही.
कंडोनिअमअर्ंतगत सिडको वसाहतीमध्ये पालिका प्रशासनाने मोफत नागरी सुविधांची कामे करावीत हा अट्टहास सर्वप्रथम संदीप नाईकांनीच मांडला. नाईकांचा पुत्र ही बिरूदावलीची झूल अंगावर मिरविण्यात समाधान न मानता सर्वसामान्य गोरगरीब जनसामान्यात, सिडको सदनिकाधारकांमधील मित्रांमध्ये संदीप नाईक युवावस्थेपासून मिरवित असल्याने त्यांना सिडको सोसायट्यातील समस्यांची प्रारंभापासून इंत्यभूत माहिती होती. कंडोनिअम अर्ंतगत मनपा प्रशासनाने मोफत कामे करावीत हा ठराव महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेवून मंजूर करवून घेतला. ठराव मंजूर केला तरी त्यास मंत्रालयीन पातळीवरून मंजुरी मिळणे गरजेचे होते. त्या काळात सव्वा वर्षे मंत्रालयाच्या उंबरठा झिजवून ठरावाला संदीप नाईकांनी मंत्रालयीन पातळीवरूनही मंजुरी मिळवून घेतली.
संदीप नाईकांच्या परिश्रमामुळेच सिडको वसाहतीमधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्या व जलवाहिन्या मोफत बदली झाल्या आहेत. आज सिडको वसाहतीमध्ये पेव्हर ब्लॉक बसल्याने पावसाळा कालावधी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात चिखल-गाळातून ये-जा करावी लागत नाही. संदीप नाईकांनी केलेल्या कामाच्या पाठबळावर विरोधकांचे अपप्रचार खोडून विकासावर मते मिळण्याची क्षमता असतानाही एनसीपी थिक टँक संदीप नाईकांच्या कामांना का नजरेआड करत आहे यामुळे नवी मुंबईतील युवा मतदार आजही संभ्रमात पडले आहेत.