बेेलापूूर येथील मँगो गार्डनच्या जेष्ठ नागरिकांचा निर्धार
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रासारखी अभिनव संकल्पना खा. संजीव नाईक यांनी नवी मुंबईत राबविली आहे.त्यांचीही योजना जेष्ठ नागरिकांना दिलादायी आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाचे नाईक यांनी मागील ववर्षात केलेली विकास कामे पाहता अशा प्रकारची लोकाभिमुख कामे करणारा आणि आशेचा किरण ठरलेला खासदार पुन्हा आम्हांला हवा, असा निर्धार सीबीडी-बेलापूर येथील असोसिएशन फॉर सिनिअर सीटीजन मॉडेल हाऊस मँगो गार्डन येथील पितृतुल्य जेष्ठ नागरिकांनी केला आहे. शेकडो जेष्ठ नागरिकांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांना लेखी पत्रक देऊन जाहिर पाठिंबा दिला आहे.
असोसिएशन फॉर सिनिअर सीटीजन मॉडेल हाऊस मँगो गार्डन येथील जेष्ठ नागरिकांच्या समवेत पालकमंत्री ना.गणेश नाईक यांना निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती लेफ्टनंट कर्नल श्री.डी.पी.सिंग, संस्थेचे उपाध्यक्ष एस.एस.मुखर्जी, व्हाईस प्रेसिडेंट क्यू.एच.खान, शर्मा गांधी, राठोड दोशी, कविश्वार, जयवंत सिंग, दर्शन सिंग, सुशिलकुमार हलदार, श्रीमती शशी रस्टोगी, श्रीमती परमजीत कौर, समाजसेवक नंदू चव्हाण, अशोकभाई कांबळे, पोपट हिरवे, रघुनाथ गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. संजीव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या शुभेच्छापर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी नाईक यांना पाठिंबा दिला आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघात मागील पाच वर्षात नाईक यांनी वैशिष्ट्यपुर्ण विकास कामे करून सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे. लोकसभेत अभ्यासपुर्ण विषय मांडण्यात खा. नाईक यांचा हातखंडा आहे. नवी मुंबईच्या जडण घडणीत त्यांचे आजवर मौलिक योगदान आहे. मन मिळावू स्वभाव आणि सर्व सामान्य नागरिकांशी नाईक यांनी जोडलेले अनामिक नाते यामुळे जेष्ठ नागरिकांनी त्यांना नेहमीच कृपाभिलाषित केले आहे. नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मँगो गार्डन येथील जेष्ठ नागरिकांनी नाईक यांना लोकसभेसाठी जाहिर पाठिंबा दिला आहे. नाईक यांना नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर येथील नागरिक पुन्हा लोकसभेत पाठविणारच असा आशावाद व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.