मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : उन्हाच्या उकाड्याने लोकसभा निवडणूक लढणारे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते हैराण झाले आहेत. तथापि मंगळवारपासून शाळेचे नवीन शैक्षणिक वर्षासाठी जाणार्या अडीच वर्षापासूनच्या बालकांच्या चेहर्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. बच्चे कंपनीच्या शाळेतील पहिल्या दिवसामुळे सिवूड्स परिसरात कलकलाट होता.
नवी मुंबईतील ख्यातनाम शैक्षणिक संस्थांमध्ये सिवूड्स परिसरातील डी.ए.व्ही पब्लिक स्कूलचा समावेश होतो. या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देण्यासाठी पालक परिश्रमाची शिकस्त करत असतात.
१६ एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे डी.ए.व्ही शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. नर्सरी, ज्यु.केजी, सिनिअर केजीसह इतरही वर्ग सुरू झाले. लहान मुलांचा उत्साह पाहिल्यावर उकाडाही यांच्यापुढे माघार घेत असल्याचे पहावयास मिळाले. इतर शाळांमध्ये सुट्टी पडल्याने बालक-पालक गावी जाण्याची तयारी करत असताना डीएव्ही शाळेतील बालक-पालक मुलांच्या शैक्षणिक खरेदीसाठी व्यस्त असल्याचे गेल्या पाच-सहा दिवसात पहावयास मिळाले. डीएव्ही शाळेनजिकचा परिसर पुन्हा एकवार लहान मुलांच्या किलबिलाटाने दणाणून गेला.