अमोल शीरसागर
ठाणे : ज्या उमेदवारावर २४ गंभीर फौजदारी गुन्ह्याची नोंद आहे, असा शिवसेनेचा उमेदवार राजन विचार यांचा पराभव करून सुज्ञ मतदार त्यांना धडा शिकवतील, असा एनसीपीचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान आणि एनसीपीचे नेते अशोक पोहेकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
एनसीपी, कॉंग्रेस आणि पीआरपी आघाडीचे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील उमेदवार अनुक्रमे संजीव नाईक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या १६ एप्रिल २०१४ रोजी ठाणे आणि कल्याण येथे येणार आहेत. तसेच २० एप्रिल २०१४ रोजी एनसीपीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची जाहिर सभा होणार आहे. त्या बाबतची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रधान व पोहेकर आणि कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर बोलत होते.
शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी एनसीपीच्या नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या बिनबुडाच्या आरोपामधील हवाच काढून घेतली. ज्या ठाण्यामध्ये शिवसेना भाजपाची सत्ता आहे त्या ठाणे महापालिकेतील ४१ टक्क्यांचे प्रकरण शिसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघेे यांनीच चव्हाट्यावर आणले होते. या टक्केवारीच्या प्रकरणामुळे ही महापालिका देशभरात बदनाम झाली होती. या टक्केवारीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शासनाने तत्कालीन सनदी अधिकारी श्री नंदलाल यांची समिती गठीत केली होती. या कमिटीच्या अहवालात राजन विचारे यांचे नाव आरोपीच्या यादीमध्ये होते. या प्रकरणी गुन्हेदेखील त्यांच्यावर दाखल होते. असे आरोपी विचारे हे इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत हे हास्यास्पद असून अगोदर विचारेंनी या टक्केवारी प्रकरणाचे उत्तर द्यावे असा पलटवारही श्री. प्रधान यांनी केला.
शिवसेनेचे उपनेते नाहटा हे २००६ ते २०१० या कालावधीत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यावेळेस या महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचार त्यांना कसा दिसला नाही. असा सवाल देखील प्रधान यांनी केला. आयुक्तपदी असतानाही नाहटा यांनी त्यावेळी पालिकेत सुरु असलेल्या कथीत भ्रष्टाचाराची चौकशी का लावली नाही असा जळजळीत सवाल करुन आता नाहटा जे आरोप करीत आहेत. ते केवळ शिवसेनेचे उपनेते म्हणून राजकिय हेतूने आरोप करीत असल्याचे श्री प्रधान म्हणाले.
श्री. पोहेकर यांनी देखील उपनेते नहाटा यांच्यावर टीका केली. आयुक्त पदावरुन निवृत्त झाल्यानंतर श्री नाहटा यांनी शहापूर येथे तब्बल २५० एकर जमिन खरेदी केली आहे. ही जमिन खरेदी करण्यासाठी एवढया मोठया प्रमाणावर त्यांनी पैसा कुठुन आणला यांची चौकशी आम्ही करत असून त्याबाबत चे पुरावे हाती लागताच कायदेशीर कार्यवाही करणार असल्याची माहीती पोहेकर यांनी दिली. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्यावर नाहटा यांनी केलेल्या आरोपांबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. यानंतर नाहटा आणि शिवसेनेच्या आरोप करणार्या नेत्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे तेे म्हणाले. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर तब्बल २४ फौजदारी गुन्ह्यांची नोंद आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कळवा, वांगळे इस्टेट आदी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये घर बळकावणे, दंगल माजविणे, जीवे ठार मारण्याची धमकी, घातक शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा आनणे अशा गंभीर गुन्हांची नोंद आहे. त्यामुळे आपले गुन्हे दडविण्यासाठी विचारे विकास कामांपेक्षा कोर्ट कचेरीच्या कामात वर्षभर व्यस्त असतात. त्यामुळे आता मतदारांनी आता ठरवायचे आहे की, आपल्याला गुंड प्रवृत्तीचा आणि गुन्हेगारी टॅ्रक रेकॉर्ड असणारा राजन विचारे सारखा उमेदवार खासदार म्हणून हवा आहे की, निष्कलांक स्वच्छ प्रतिमेचे जनहिताची विकास कामे करुन संसदेत आपल्या कामगिरीची छाप पाडणारे संजीव नाईक यांच्यासारखे उमेदवार खासदार म्हणून पाहिजेत याचा सुज्ञ मतदारांनी विचार करावा असे आवाहन प्रधान व पोहेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आघाडीच्या उमेद्वारांच्या विरोधात काम करीत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पुर्णेकर यांनी कॉंग्रेसची पुर्ण ताकद आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याचे ठामपणे सांगितले डॉ. नाईक यांचा उमेद्वारी अर्ज दाखल करीत असताना नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, ठाण्याचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः आणि भाईंदरचे अध्यक्ष असे तिघेंही उपस्थित होतो. निवडणुक प्रचारामध्ये कॉंग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एनसीपी सोबत खादयांला खांदा लावून काम करीत आहेत. मीरा-भाईंदरमध्ये काल सोमवारी नाईक यांच्या प्रचारासाठी युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा पार पडल्याचे पुर्णेकर यांनी सांगितले.
आघाडीच्या विरोधात काम करणारे कोकणातील राष्ट्रवादीचे आ. केसरकर यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलबंनाची कार्यवाही केली आहे. हा विषय येथे संपला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आघाडीचा धर्म पाळणार असून नाईक यांना बहुमताने विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही पुर्णेकर यांनी दिली. नवी मुंबईआणि मीरा-भाईंदरमध्ये निवडणुक प्रचाराचे बॅनर आणि होर्डिग लावण्यासाठी जागा दिली जात नसल्याचा
आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. याबाबत पोहेकर यांनी सेना नेत्यांचा समाचार घेतला निवडणूका जाहिर होताच आम्ही सर्व प्रक्रीया पूर्ण करत होर्डिगसाठी जागा आरक्षित केल्या होत्या. शिवसेनेला आपला उमेद्वार कोण आहे हे घोषित करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शोधा शोध करावी लागली. मात्र आघाडीने तीन महिने आदीच संजीव नाईक यांची उमेदवारी निश्चित केली होती. शिवसेनेचे नेते त्यामुळे लेटलतिफ असल्यासारखे वागले त्याचाच परिणाम होर्डिगच्या विषयांवर झाला आहे. अशा प्रकारचा आमच्यावर आरोप करणे म्हणजे स्वतःची अकार्यक्षमता दाखवून देण्यासारखे आहे. निवडणूक प्रचारांची आमची मतदारसंघात एक फेरी पूर्ण झाली आहे. दुसर्या फेरीत रोड शो आणि चौक तसेच कॉनर सभा यावर आघाडीचा भर असणार आहे. अशी माहीती श्री. प्रधान यांनी दिली. आम्ही शिवसेनेच्या निवडणुक प्रचारादरम्यान कार्यकुशल नाईक कुटुबिंयावर वैयक्तीक पध्दतीची टिका केली आहे. आम्ही मात्र विकासाच्या मुद्यावर बोलत होतो आणि बोलत राहू. परंतू शिवसेनेच्या नेत्यांनी विकासकामे केलीच नसल्याने ते वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करीत असल्याचा घणाघात ही प्रधान यांनी केला.