नवी मुंबई : एपीएमसी मार्केट आवारातील किराणा दुकान मार्केट आणि माथाडी भवनच्या मध्यभागी असणार्या माथाडी भवनची पाहणी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त आबासाहेब जर्हाड यांना साकडे घातले आहे.
२४ एप्रिलला मतदान संपल्यावर २५ एप्रिलला प्रभागातील माथाडी कामगारांचे आभार मानण्यासाठी नगरसेवक मांडवे एपीएमसीतील गाळ्यावर जावून आपल्या प्रभागातील माथाडी कामगारांना भेटले. यावेळी माथाडी कामगारांनी नगरसेवक मांडवे यांना माथाडी भवन उद्यानात नेवून उद्यानाची दुर्रावस्था दाखविली. उद्यानाला आलेली अवकळा व उद्यान विकसिकरणास दाखविलेली अनास्था, उद्यानाच्या कोपर्यावर गॅरेजचालकाचे अतिक्रमण आदी समस्या माथाडी कामगारांनी नगरसेवक मांडवेंच्या निदर्शनास आणून दिल्या. नगरसेवक मांडवे हे स्वत: एका माथाडी कामगारांचे पुत्र असल्यानेे माथाडी कामगारांच्या विसाव्यासाठी उभारण्यात आलेल्या माथाडी भवन उद्यानाच्या विकसिकरणासाठी आपण स्वत: महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करू आणि महापालिका आयुक्तांनी स्वत: उद्यानाची पाहणी करण्यासाठी यावे यासाठीही प्रयास करू असे नगरसेवक मांडवे यांनी माथाडी कामगारांना सांगितले होते.
महापालिका आयुक्तांना दिलेेल्या लेखी निवेदनात नगरसेवक मांडवे यांनी आयुक्तांनी स्वत: या उद्यानाची पाहणी करावी आणि या पाहणी अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली आहे.
निवेदनात हे उद्यान माझ्या प्रभागात येेत नसले तरी स्थानिक माथाडी कामगारांच्या आग्रहास्तव या उद्यानाची दुर्रावस्था दूर व्हावी याच एकमेव हेेतूने पाठपुरावा करत असल्याचे मांडवे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहेे.