योगेश शेटे
नवी मुंबई : गेली वर्षभर महापालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाला समस्येचे गांभीर्य लक्षात येत नाही. उद्यानाची तुटलेली संरक्षक भिंत बांधण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. संरक्षक भिंत तुटल्याने नेरूळ सेक्टर ६ मधील सिडकोच्या सिव्ह्यू या गृहनिर्माण सोसायटीत रात्री-अपरात्रीही थेट प्रवेश करता येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तुटलेल्या संरक्षक भिंतीचा फायदा उचलत चोरट्यांनी नेरूळ सिव्ह्यू या गृहनिर्माण सोसायटीत चोरी, दरोडा अथवा घरफोडी केल्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे बुधवारी एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात चोरी, घरफोडीचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढीस लागलेे आहे. सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील सिडकोच्या शिवम सोसायटीत झालेल्या चोर्या व घरफोड्यांचाही पोलीसांना शोध घेता आलेला नाही. शिवम सोसायटीत रात्री-अपरात्री बाहेरील घटकांचा उघडपणे वावर होत असतानाही या बाहेरील घटकांचा बंदोबस्त करण्यास नेरूळ पोलीसांना दारूण अपयश आलेेले आहे. शिवम सोसायटीच्या समोरीलच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मागे एकाच आठवड्यात तीन चोर्या झाल्या होत्या. नेरूळ सेक्टर सहामध्ये वाढत्या चोर्या, लुटमारी आणि शिवम सोसायटीत रात्री-अपरात्री सोसायटीबाहेरील घटकांचा वाढता वावर याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परिसरात कोणत्याही सोसायटीत नाही, पण याच शिवम सोसायटीत रात्री-अपरात्री सोसायटीबाहेरील घटकांचा खुलेआमपणे वावर पहावयास मिळत आहेे. सोसायटी आवारात रात्रीअपरात्री बिनधास्तपणे वावरणार्या बाहेरील घटकांबाबत रहीवाशांनी सोसायटीच्या पदाधिकार्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस पावले आजतागायत उचलण्यात आलेली नाहीत.
मनोज मेहेर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात नेरूळ सिव्ह्यू सोसायटीलगत असलेल्या उद्यानाची संरक्षक भिंत तुटल्याने या गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. पालिका प्रशासनामध्ये महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त, शहर अभियंता, उद्यान अभियंता, नेरूळ पालिका विभाग अधिकारी या सर्वांना सव्वा वर्षात सादर केलेल्या लेखी तक्रारींच्या सत्यप्रतीही मनोज मेहेर यांनी पोलीस आयुक्तांना सादर करून यापुढे या सिव्ह्यू गृहनिर्माण सोसायटीमध्ये चोरी, दरोडा अथवा घरफोडी झाल्यास थेट महापालिका प्रशासनावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी निवेदनातून पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मंगळवारी (दि.२९ एप्रिल) पोलीस आयुक्तांना याच विषयाला अनुसरून एक स्वतंत्र निवेदन सादर करताना नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावात उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस गस्त वाढविण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे. त्या निवेदनातही शिवम सोसायटीत झालेल्या चोर्या व घरफोडीचे गुन्हेगार अद्यापि पोलीसांना सापडले नसल्याबाबत मनोज मेहेर यांनी चिंता व्यक्त केली होती.