नवी मुंबई : १ मे रोजी स्वरराज प्रतिष्ठानच्या कार्यालय सानपाडा, सेक्टर-७ जवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना आदरांजली म्हणून त्रिवार वंदन कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला.
यावेळी उपस्थित नवी मुंबईकरांकडून फुले वाहून १०६ हुतात्म्यांना वंदन करण्यात आले व विभागातील घरकाम करणारे, हॉटेलात काम करणारे, वाण्याच्या दुकानातील कामगार कपड्याच्या दुकानातील कामगार असे जवळपास २०० हुन अधिक कष्टकरी कामगारांचा सन्मान त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जावून केला. शिवसेना सानपाडा विभागप्रमुख-मिलींद सुर्यराव, शाखाप्रमुख-सुनील गव्हाणे, महेश बनकर, बीजेपीचे रमेश शेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वरराज प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर शेवाळे व संस्थेच्या अध्यक्षा सौ. विद्या गणेश पावगे(किर्दत) यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचिता जोईल, स्नेहल चव्हाण, रमेश शेवाळे, सुनिता मिठारी, अमर तांबवेकर, नितीन शेवाळे, सुहास आमले या सर्व स्वरराज सैनिकांनी मेहनत घेतली.