* मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह कार्यकर्त्यांची घटना स्थळी धाव
नवी मुंबई : नेरूळ पूर्व सेक्टर १९ येथील गुरुद्वारा येथे रात्री महावितरणाच्या डीपी बॉक्सला दहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या भीषण आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी महावितरणच्या डीपी बॉक्सचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेरूळ पूर्व सेक्टर १९ गुरुद्वारा येथून घरी परताना मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष विनय कांबळे यांना गुरुद्वाराच्या बाजूला महावितरणच्या डीपी बॉक्सला भीषण आग लागल्याचे समजले.महावितरणच्या डीपी बॉक्सला लागलेल्या भीषण आगीमुळे महावितरणच्या तीन डीपी बॉक्सचे मोठे नुकसान झाले.यावेळी घटना स्थळी उपस्थित नागरिकांकडून मोठी भीती व्यक्त केली जात होती.महावितरणच्या डीपी बॉक्सला भीषण आग लागल्यामुळे परिसरात काही तास वीजपुरवठा बंद होता. डीपी बॉक्सला लागलेल्या भीषण आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष विनय कांबळे यांनी महावितरणचे नेरूळ विभागाचे कनिष्ठ अभियंताना भ्रमणध्वनी वरून सदर घटनेची माहिती दिली.तसेच मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष विनय कांबळे यांनी विलंब न लावता तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना भ्रमणध्वनी वरून सदर घटनेची कल्पना दिली.त्यानंतर मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना नेरूळ येथे भीषण आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.यावेळी मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष विनय कांबळे,मनविसे सांस्कृतिकचे नवी मुंबई शहर चिटणीस गणेश पालवे,उपशहर अध्यक्ष योगेश शेटे,मनसेचे शाखा अध्यक्ष दिनेश गवळी,स्वप्निल घाडगे,प्रीतम गायकवाड,सागर नाईकरे,संदीप दहिफळे,निखिल गावडे,आप्पा कोथूळे,श्रीकांत माने घटना स्थळी उपस्थित होते.त्यानंतर काही वेळातच महावितरणचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले.अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विजविली. महावितरणच्या कर्मचार्यानी तात्काळ काम सुरु करून परिसरातील विजपुरवठा पुन्हा सुरु केला.मनसेच्या कार्यकर्त्यांनी वेळीच दाखवलेल्या सावधानतेमुळे अनर्थ टळला.