नवी मुंबई /प्रतिनिधी
काही दिवसांपासून धो धो कोसळणार्या पावसाने शहरातील रस्त्याची चाळण केल्याने भलेमोठे खड्डे रस्त्यांवर पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते गेले वाहून म्हणण्याची पाळी नवी मुंबईकरांवर येवून ठेपली आहे .त्यातच अवघ्या काही दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार आहे . बाप्पाच्या आगमना पूर्वी शहरातील खड्ड्याचे विघ्न टाळावे यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील रस्त्या वरील खड्डे बुजवावेत अशी मागणी शिवसेना पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील यांनी पालिका आयुक्तान कडे लेखी निवेदना द्वारे केली आहे . शिवाय जर येत्या पंधरा दिवसां मध्ये पालिका प्रशासनाने जर रस्त्याच्या खड्ड्यांना खडीचा मुलामा देवून खड्डे बुजविले नाहीत तर नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडून खड्यात गप्पी मासे सोडण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे .
तसेच सायन पनवेल महामार्गावर पडलेल्या तब्बल २२१ खाड्या मुळे करदात्य असणार्या वाहन चालकांना देखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट दिली जाणार असल्याचे देखील सरोज पाटील यांनी यावेळी सांगितले .पालिका प्रशासनाने लाखो करोडो रुपये खर्चून निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करून नवी मुंबईच्या करदात्या असणार्याची फसवणूक केली आहे. शिवाय महाराष्ट्र ओउद्योगिक पट्ट्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. औद्योेगिक पट्ट्यातील रस्त्यांना भल्या मोठ्या खड्यांनी गिळंकृत केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . पालिका प्रशासनाने बाप्पाच्या आगमनापूर्वी खड्यांना मुलामा देण्यात यावे अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सरोज पाटील यांनी दिला आहे.