दिपक देशमुख
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नवी मुंबईच्या वतीने रविवार, दि. १० ऑगस्ट रोजी सानपाड्यात दहीहंडी सराव कार्यक्रमाचे जाहीर आयोजन केले असून यंदाचे मनविसे नवी मुंबईचे सातवे वर्ष असल्याची माहिती मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील यांनी दिली.
सानपाडा सेक्टर ५ येथील पारसिक बँकेजवळील चौकात हा कार्यक्रम सांयकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, मनसेचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष गिरीश धानुरकर, मनसेच्या महिला उपाध्यक्षा रिटा गुप्ता, मनविसेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी, मनसेचे माजी शहर अध्यक्ष जितेंद्र कांबळी व घणसोलीतील मनसेचे माजी विभाग अध्यक्ष कृष्णा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
मनसेचे नवी मुंबई शहर कार्यकारिणीतील मनसे नवी मुंबई उपाध्यक्ष निलेश बाणखिले, गजानन खबाले, विनोद पार्टे ,धीरज भोईर आदी प्रमुख पाहूणे म्हणून या उत्सवात सहभागी होणार आहेत.
मनकासेचे शहर चिटणिस दिगंबर पाटील, मनविसेचे शहर चिटणिस संजय पवार, विधानसभा अध्यक्ष अविनाश सुतार, जयेश म्हात्रे, मनविसे सांस्कृतिकचे ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार, शहर अध्यक्ष गिरीराज दरेकर, विधानसभा सचिव अकुंश सानप, प्रेम दुबे यांच्यासह मनविसेचे नवी मुंबईतील पदाधिकारी या कार्यक्रमाचे निमत्रंक आहेत.
मनविसे या दहीहंडी उत्सव सराव कार्यक्रमात दरवर्षी नवी मुंबई, ठाणे, उरण-पनवेल, मुंबई शहर व उपनगरातील गोविंदा पथके सहभागी होत असून सानपाडावासियांनाच नाही तर नवी मुंबईकरांना गोविंदा पथकाचा सराव आणि जल्लोष जवळून पहावयास मिळत असल्याचे मनविसे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील यांनी सांगितले.